7th SS Textbook Solution Lesson 14.BHARATACHE PAHILE SWATANTRYA YUDDHA (1857 - 1858) (पाठ 14.भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध)

"इंग्रजांनी 1857 मध्ये नवीन प्रकारची एनफिल्ड रायफल ही बंदूक भारतीय सैन्यात आणली.या रायफलचा वापर करताना त्या काडतूसाचे आवरण दातांनी तोडून टाकावे लागे."

13 min read

 


इयत्ता - सातवी

विषय - समाज विज्ञान 

माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - २०२२ सुधारित 

 स्वाध्याय 

पाठ  14.भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध

 
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 
1. 1857
च्या स्वातंत्र्य युद्धाचे तात्कालीक कारण कोणते होते ?
उत्तर - इंग्रजांनी 1857 मध्ये नवीन प्रकारची एनफिल्ड रायफल ही बंदूक भारतीय सैन्यात आणली.या रायफलचा वापर करताना त्या काडतूसाचे आवरण दातांनी तोडून टाकावे लागे.या काडतूसांना गाईंची व डूकरांची चरबी फासलेली होती.अशी बातमी समजताच हिंदू,मुस्लीम शिपायांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि सैनिकांनी काडतूसांचा वापर करण्यास नकार दिला, म्हणून त्याना शिक्षा दिली जावू लागली.हेच 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाचे तात्कालीक कारण ठरले.
2.
मंगल पांडे कोण होता ?
उत्तर- मंगल पांडे हे 1857 च्या भारतीय स्वातंत्र्य युद्धापूर्वीच्या घटनांमध्ये महत्वाची भूमिका बजावनारे एक भारतीय सैनिक होते.
3. 1857
च्या स्वातंत्र्य युध्दाचा कोणताही एक परिणाम सांगा ?
उत्तर - 1857 च्या स्वातंत्र्य युध्दाचे परिणाम दूरगामी झाले.
1.
या चळवळीमुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली.
2. 1858
मध्ये राणी व्हिक्टोरीयाने भारतीयांचे हक्क चालीरिती आणि पध्दती यांचा आदर करण्याचे घोषणापत्रात वचन दिले.
3.
ही चळवळ पुढे आधुनिक राष्ट्रीय चळवळीच्या उदयाला कारण ठरली आणि पुढील स्वातंत्र्य संग्रामाला स्फूर्ती मिळाली.
4. 1857
च्या स्वातंत्र्य युध्दाला 'भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध' असे सर्व प्रथम कोणी म्हटले ?
उत्तर - 1857 च्या स्वातंत्र्य युध्दाला 'भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध' असे सर्व प्रथम विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटले.

 
टिपा लिहा.
1.
स्वातंत्र्य युद्धाची कारणे.
उत्तर -  स्वातंत्र्य युद्धाची कारणे खालीलप्रमाणे -:
1.
लॉर्ड वेलस्लीच्या सहाय्यक सैन्य पध्दतीमुळे, लॉर्ड डलहौसीच्या आक्रमणामुळे अनेक महाराजे व नवाब पदच्युत करण्यात आले त्यामूळे त्यांच्यात असंतोष पसरला.
2.
सर्व नागरी, लष्करी उच्च पदे युरोपियन लोकांच्यासाठी राखीव ठेवल्याने भारतीय लोक नाराज झाले
3.
ब्रिटिशांच्या व्यावसायिक धोरणामुळे गृह उद्योग आणि इतर स्थानिक व्यवसाय नष्ट झाले.
4.
शेतीच्या व्यापारीकरणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली त्यामुळे शेतकरी नाराज झाले
5.
ब्रिटिशांनी भारतीयांना 'डुक्कर',' काळे लोक ' असे चिडवले याचा भारतीयांना राग आला.
6.
भारतीय सैनिकांपेक्षा ब्रिटिश सैनिकांना जास्त वेतन वाढती व इतर सुविधा दिल्याने भारतीय सैनिक नाराज झाले.
7.
एनफिल्ड रायफल च्या काढताना गाईची व डुकरांची चरबी असल्याने हिंदू-मुस्लिम शिपायांच्या धार्मिक भावना दुखावल्या.
2. मंगल पांडे.
उत्तर -  मंगल पांडे हे 1857 च्या भारतीय स्वातंत्र्य युद्धापूर्वीच्या घटनांमध्ये महत्वाची भूमिका बजावनारे एक भारतीय सैनिक होते. मंगल पांडे यांनी बराकपूर येथे चरबी लावलेल्या बंदुका वापरण्यास नकार दिला व एका ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडून ब्रिटिशांना विरोध केला या घटनेमुळे 1857 च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धाला गती मिळाली.

 
3. झांशीची राणी लक्ष्मीबाई.
उत्तर -  राणी लक्ष्मीबाई या झांशी संस्थानाच्या राणी होत्या.राणी लक्ष्मीबाई या 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धातील प्रमुख सेनानी होत्या.त्यांच्यामुळे 1857 च्या युद्धाला स्फूर्ती मिळाली होती.गव्हर्नर जनरल डलहौसीने दत्तक वारस नामंजूर कायद्याने झांशी संस्थान खालसा केले.पण 'मी माझी झांशी देणार नाही' असे उद्गार काढून ब्रिटीशांविरुद्ध राणीने युद्ध पुकारले. वयाच्या 23 व्या वर्षी या शूर राणीला वीरमरण आले.
4.
दुसरा बहादूर शहा- 

 उत्तर - दुसरा बहादूर शाह,ज्याला बहादूर शाह जफर II असेही म्हणतात,हा भारताचा शेवटचा मुघल सम्राट होता.

    - 1857 च्या उठावा दरम्यान दिल्लीतील बंडखोरांनी त्यांना भारताचा सम्राट घोषित केले होते.

    - त्यांची भूमिका मुख्यत्वे प्रतिकात्मक होती आणि त्याच्याकडे मर्यादित शक्ती होती.उठाव अयशस्वी झाल्यानंतर, त्याला ब्रिटिशांनी पकडले आणि निर्वासित केले.


 
इयत्ता - सातवी

विषय - मराठी
सत्र -2
📝प्रश्नोत्तरे📝
*🧿13. संतवाणी (अभंग) (श्लोक)

*🧿14. डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद

*🧿15. तीन प्रश्न (चित्रकथा)

*🧿16. क्षणात जिंकीन (कविता)

*🧿17. आमची गोव्याची सहल

*🧿18. वयाची अट नाही

*🧿19. अपंग आम्हा म्हणू नका (कविता)

*🧿20. जावयाची करामत

*🧿21. वाढती लोकसंख्या-एक समस्या

 
टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share