KSEEB 10TH SS 2.ब्रिटिश सत्तेचा विस्तार
"10वीच्या इतिहासात 'ब्रिटिश सत्तेचा विस्तार' हे एक महत्त्वाचे प्रकरण आहे. या ब्लॉगमध्ये अँग्लो-मराठा युद्धे, सहाय्यक सैन्य पद्धती, खालसा धोरण व शीख यु"
CLASS - 10
MEDIUM - MARATHI
SUBJECT - SOCIAL SCIENCE
SYLLABUS - KARNATAKA STATE
IMP NOTES AND MODEL ANSWERS
नमुना प्रश्नोत्तरे
📘 प्रकरण 2 – ब्रिटिश सत्तेचा विस्तार
१. प्रस्तावना
A. प्रकरणाचे महत्त्व:‘ब्रिटिश सत्तेचा विस्तार’ हे १० वीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे प्रकरण आहे. यावर अनेकदा दीर्घ उत्तरे, संघटक प्रश्न व चिन्ह प्रश्न विचारले जातात.
B. काय शिकायला मिळते?
या प्रकरणातून इंग्रजांनी भारतातील सत्ता कशी मिळवली, कोणत्या नीती वापरल्या आणि भारतीय सत्तांशी त्यांनी कसे लढा दिला हे समजते.
C. प्रमुख घटक:
अँग्लो-मराठा युद्धे
सहाय्यक सैन्य पद्धती
खालसा धोरण
अँग्लो-शीख युद्धे
२. इंग्रज सत्तेचा प्रारंभ आणि विस्तार
A. प्लासी व बक्सारच्या लढायांचे परिणाम:
या लढायांमुळे बंगाल प्रांत इंग्रजांच्या ताब्यात आला व ईस्ट इंडिया कंपनीला भारतात सत्तेची पायाभरणी करता आली.
B. पूर्व भारतातील नियंत्रण:
1765 नंतर इंग्रजांनी बंगाल, बिहार आणि ओरिसा या भागांवर पूर्ण वर्चस्व मिळवले.
C. पश्चिम व दक्षिण भारतातील अडथळे:
मराठे, म्हैसूरचे हैदर अली व टिपू सुलतान, तसेच पंजाबमधील शीख हे इंग्रजांसाठी मोठे अडथळे ठरले.
---
2. अँग्लो-मराठा युद्धे
A. पहिले अँग्लो-मराठा युद्ध (1775–1782):
राघोबादादांच्या सत्तेच्या महत्त्वाकांक्षेमुळे व मराठ्यांतील कलहामुळे हे युद्ध झाले. शेवटी सालबाईचा करार झाला.
B. दुसरे अँग्लो-मराठा युद्ध (1803–1805):
मराठा सरदारांतील अंतर्गत संघर्षामुळे बासेनचा तह झाला व लॉर्ड वेलस्लीने सहाय्यक सैन्य पद्धती वापरून आपला प्रभाव वाढवला.
C. तिसरे अँग्लो-मराठा युद्ध (1817–1818):
पेशव्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. कोरेगाव-आष्टी लढ्यांनंतर पेशवेपद रद्द करण्यात आले आणि मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.
3. सहाय्यक सैन्य पद्धती
A. लॉर्ड वेलस्लीचे धोरण:
राज्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी वेलस्लीने 1798 मध्ये ही योजना सुरू केली.
B. मुख्य अटी:
ब्रिटिश सैन्य ठेवणे
खर्च राज्यकर्त्याने करणे
ब्रिटिश वकील दरबारात असणे
इतर युरोपियनांशी संपर्कास बंदी
C. ही पद्धती स्वीकारलेली राज्ये:
हैदराबाद, म्हैसूर, तंजावर, ग्वाल्हेर, पुणे इत्यादी.
D. परिणाम:
भारतीय राजांचे स्वातंत्र्य संपले आणि इंग्रजांचा आर्थिक व लष्करी ताबा वाढला.
---
५. खालसा धोरण (दत्तक वारसा नामंजूर)
A. लॉर्ड डलहौसीचे धोरण: दत्तक वारसाला गादीवर बसण्याचा हक्क नाकारून संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन केली.
B. प्रमुख संस्थाने: सातारा, नागपूर, झाशी, उदयपूर इत्यादी.
C. भारतीयांचा विरोध: हे धोरण अन्यायकारक वाटल्याने 1857 च्या उठावासाठी जनतेत असंतोष वाढला.
---
६. अँग्लो-शीख युद्धे
A. रणजितसिंहचे साम्राज्य:
रणजितसिंहने पंजाबमध्ये बलशाली शीख साम्राज्य स्थापन केले होते.
B. 1845 व 1848 चे युद्ध:
रणजितसिंहच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्यात अस्थिरता निर्माण झाली. इंग्रजांनी लाहोर कराराद्वारे पंजाब ताब्यात घेतला.
C. पंजाबचा विलय:
दुसऱ्या युद्धातही शिखांचा पराभव झाला आणि लॉर्ड डलहौसीने पंजाब ब्रिटिश साम्राज्यात विलीन केला.
6. स्वाध्याय
I. रिकाम्या जागा भरा:
1. पहिल्या अँग्लो-मराठा युद्धाच्या शेवटी ब्रिटिश व मराठ्यांमध्ये सालबाईचा करार झाला.
2. 'सहाय्यक सैन्य पद्धती' लॉर्ड वेलस्ली यांने अंमलात आणली.
3. पंजाब संस्थान ब्रिटिश साम्राज्यात विलीनीकरण करणारा ब्रिटिश जनरल डलहौसी होता.
4. खालसा धोरण (दत्तक वारसा नामंजूर) लॉर्ड डलहौसी यांने अवलंबिले.
II. समूहात चर्चा करून खालील प्रश्रांची उत्तरे लिहा.
5.
पहिल्या अँग्लो मराठा युद्धाची कारणे द्या.
उत्तर:
ब्रिटिशांनी
राघोबाला पेशवे बनवण्यासाठी मदत केली. दुसऱ्या बाजूला मराठा सरदारांनी दुसरा
माधवराव याला मान्यता दिली. या वादामुळे दोघांमध्ये लढाई झाली. इंग्रजांनी यात
हस्तक्षेप केला आणि युद्ध झाले.
6. सहाय्यक सैन्य पद्धतीमधील अटी
सविस्तरपणे लिहा.
उत्तर: भारतीय
राजांनी त्यांच्या राज्यात ब्रिटिश सैन्य ठेवावे लागे. याचा खर्च राज्यानेच
उचलायचा. ब्रिटिश वकील दरबारात असायचा. इतर युरोपियनांशी संबंध ठेवायला मनाई होती.
संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिशांची असायची.
7. तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धाचे वर्णन
करा.
उत्तर: पेशव्यांनी
इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. पुण्यातील रेसिडेन्सीवर हल्ला केला. कोरेगाव व आष्टी
येथे लढाई झाली. शेवटी पेशवा शरण गेला आणि मराठा सत्तेचा अंत झाला.
8. खालसा धोरण भारतातील ब्रिटीश
साम्राज्याच्या विस्ताराला कसे पूरक ठरले?
उत्तर: खालसा
धोरणामुळे दत्तक पुत्रांना वारस नाकारण्यात आला. त्यामुळे संस्थाने थेट ब्रिटिश
साम्राज्यात आली. यामुळे अनेक लहान मोठी राज्ये इंग्रजांनी बळकावली. ब्रिटिश सत्ता
भारतभर पसरली.
9. खालसा धोरणांतर्गत कोणकोणती संस्थाने
विलीन झाली ?
उत्तर: सातारा, झाशी, नागपूर,
संबळपूर, उदयपूर, जयपूर
ही प्रमुख संस्थाने होती. ही सर्व राज्ये डलहौसीने ब्रिटिश साम्राज्यात मिळवली. या
धोरणामुळे देशात असंतोष पसरला.
15 सराव प्रश्न (1 गुणाचे प्रश्न)
1. सालबाई करार कोणत्या युद्धानंतर झाला?
उत्तर: पहिले अँग्लो-मराठा युद्ध
2. सहाय्यक सैन्य पद्धती कोणी लागू केली?
उत्तर: लॉर्ड वेलस्ली
3. डलहौसीने कोणते धोरण अवलंबले?
उत्तर: दत्तक वारसा नामंजूर धोरण
4. सहाय्यक सैन्य पद्धती स्वीकारणारा पहिला राजा कोण?
उत्तर: हैदराबादचा निजाम
5. दुसऱ्या बाजीरावाने कोणत्या तहात इंग्रजांशी करार केला?
उत्तर: बासेनचा तह
6. रणजितसिंगने कोणते साम्राज्य उभे केले?
उत्तर: शीख साम्राज्य
7. अँग्लो-शीख युद्धानंतर कोणता करार झाला?
उत्तर: लाहोर करार
8. कोणत्या वर्षी तिसरे अँग्लो-मराठा युद्ध झाले?
उत्तर: 1817-1818
9. दत्तक वारसाचा कायदेशीर हक्क नाकारणारे धोरण कोणते?
उत्तर: खालसा धोरण
10. मराठा सरदारांमधील अंतर्गत संघर्षामुळे कोणते युद्ध झाले?
उत्तर: दुसरे अँग्लो-मराठा युद्ध
11. पेशव्यांनी कोणत्या ठिकाणी जाळपोळ केली?
उत्तर: पुणे
12. शीख बंडाचे नेतृत्व लाहोरमध्ये कोणी केले?
उत्तर: चत्तारसिंग अट्टारिवाल
13. डलहौसी कोणत्या वर्षी भारतात आला?
उत्तर: 1848
14. अँग्लो-मराठा युद्धात कोणता करार झाला?
उत्तर: सालबाईचा करार
15. रणजितसिंगचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला?
उत्तर: 1839
---
विद्यार्थ्यांनो,हे प्रकरण फक्त परीक्षा दृष्टिकोनातूनच नव्हे तर भारतीय इतिहासातील इंग्रजी सत्ता स्थापनेचा समग्र आढावा घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक घटकाचे मूलभूत समजून घेतल्यास कोणतीही परीक्षा सोपी होईल.
पाठावर आधारित 15 बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) सराव चाचणी दिली आहे. प्रत्येक प्रश्नास चार पर्याय दिले असून बरोबर उत्तर चिन्हांकित केले आहे.