भगवान बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी कर्नाटक शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

"कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलत दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्ध यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे."

3 min read

 "कर्नाटक शासनाचा ऐतिहासिक निर्णय: भगवान बुद्ध जयंती शासकीय पातळीवर साजरी होणार!"


     कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलत दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्ध यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्नड आणि संस्कृती विभागाच्या प्रस्तावावर आधारित हा निर्णय घेण्यात आला असून, राज्यभर विभागामार्फत हा उत्सव साजरा केला जाणार आहे.

     जगातील महान तत्त्वज्ञ आणि शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध हे भारतात जन्मले.आशिया खंडातील अनेक देशांत बुद्ध जयंती राष्ट्रीय सण म्हणून साजरी केली जाते.अशावेळी भारतात – त्यांच्या जन्मभूमीत – त्यांच्या कार्याची आणि तत्त्वज्ञानाची महती समजने गरजेचे होते.

     सदर निर्णयामुळे बुद्ध विचारधारेचा प्रसार वाढण्यास मदत होईल आणि युवकांमध्ये शांती, सहिष्णुता आणि मानवतावादी मूल्यांची जोपासना होईल. या जयंतीच्या आयोजनासाठी लागणारा खर्च 2025-26 या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या विशेष निधीतून केला जाईल.

    कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, भगवान बुद्ध यांच्या विचारांची नवी पिढीला ओळख करून देण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.


कर्नाटक सरकारचा आदेश दि. 08.04.2025

विषय: भगवान बुद्ध जयंती साजरी करण्याबाबत...

 संचालक, कन्नड व संस्कृती विभाग, एकसंच फाईल क्रमांक: डिकेसी-40025/28/2023 (1197234).

प्रस्तावना:

    वरील फाईलमध्ये, सहकार संस्था अपरीक्षक (नि.), मैसूर यांनी दिनांक 19.08.2023 रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,महावीर, कनकदास यांसारख्या थोर तत्त्वज्ञांची जयंतींना राष्ट्रीय सणांच्या यादीत समाविष्ट करून त्यांचे उत्सव शासनाने लागू केले आहेत. आशिया खंडातील अनेक देशांमध्ये बुद्ध जयंती हा राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यामुळे जगातील पहिला आणि श्रेष्ठ तत्त्वज्ञ असलेल्या बुद्धांची जयंती भारतात – त्यांच्या जन्मभूमीत – शासकीय पातळीवर साजरी करणे योग्य आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे बुद्ध जयंतीला राष्ट्रीय सणांच्या यादीत समाविष्ट करून दरवर्षी शासकीयरीत्या साजरी करण्यासाठी शासन आदेश द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

   तथापि, कन्नड व संस्कृती विभागामार्फत आधीच विविध 32 थोर व्यक्तींच्या जयंती वार्षिक पातळीवर साजऱ्या केल्या जातात.त्यामुळे भगवान बुद्ध जयंती साजरी करण्याबाबत सरकारकडून मार्गदर्शन मिळावे, अशी विनंती कन्नड व संस्कृती विभागाने केली आहे.

वरील प्रस्तावाची सखोल तपासणी केल्यानंतर खालीलप्रमाणे शासन आदेश दिला आहे.

शासन आदेश क्रमांक: कसंवा 114 कसंधा 2022 (भाग-3)
बंगळुरू, दिनांक: 08.04.2025

प्रस्तावात नमूद केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर,भगवान बुद्धांची जयंती दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला राज्यभर कन्नड आणि संस्कृती विभागामार्फत साजरी करण्याचा शासन निर्णय घेतला आहे.

सदर जयंतीच्या आयोजनासाठी लागणारा खर्च वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षातील "2205-00-102-1-70-0590" या लेखाशिर्षकांतर्गत दिलेल्या निधीतून भागविण्यात यावा.

कर्नाटक राज्यपालांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या नावाने – कन्नड आणि संस्कृती विभाग (संस्कृती)


Download Circular



टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share