इयत्ता - पाचवी
विषय - माय मराठी
पाठ - 8
8. हरवलेल्या पुस्तकाचे आत्मवृत्त
अ.नवीन शब्दांचे अर्थ.
आत्मवृत - स्वतःबद्दलची माहिती.
मति - बुध्दी
वित्त - पैसा, धन
अनर्थ - वाईट घटना, प्रसंग
सामर्थ्य – शक्ती
प्रतिभावंत – बुद्धिमान
आ. खालील प्रश्नांची उत्तरे 1 - 2 वाक्यात लिहा.
1.पुस्तकासंबंधी जॉन रस्किन यांचे मत कोणते आहे?
उत्तर – “पुस्तक नसलेले घर म्हणजे खोली नसलेल्या खिडकीप्रमाने असते.” असे पुस्तकासंबंधी जॉन रस्किन यांचे मत आहे.
2. राहुलला ते पुस्तक कसे मिळाले होते?
उत्तर – राहुलला ते पुस्तक अशोक काकांकडून दिवाळीची भेट म्हणून मिळाले होते.
3.पुस्तकाला अडगळीत कोणी टाकले?
उत्तर – राहुलच्या निष्काळजीपणामुळे पुस्तकाला अडगळीत पडावे लागले होते.
4.करंगळी मोडल्यासारखा त्रास पुस्तकाला केव्हा होतो?
उत्तर – जेंव्हा आपण पुस्तकाचे वाचन बंद करून त्याचा एखादा दुमडतो तेंव्हा पुस्तकाला करंगळी मोडल्यासारखा त्रास होतो.
5.पुस्तकाला आपण केव्हा नजरेस पडू असे वाटते?
उत्तर – गणेश चतुर्थी किंवा दिवाळीला घर स्वच्छ करतानाच मी नजरेस पडेन असे पुस्तकाला वाटते.
6. काय केल्याने पुस्तकाचे जीवन सार्थकी लागेल ?
उत्तर - जीवनात अपार दुःख भोगलेल्या माणसाची पुस्तकाच्या वाचनाने जीवन जगण्याची आशा पल्लवित होते.तेंव्हा पुस्तकाचे जीवन सार्थकी लागेल.
इ. खालील प्रश्नांची उत्तरे 3 4 वाक्यात लिही.
1. महात्मा जोतिबा फुले यांनी विद्येचे महत्व कोणत्या शब्दात व्यक्त केले आहे.
उत्तर - विद्येविना मति गेली । मती विना नीति गेली ।
नीति विना गति गेली । गती विना वित्त गेले ।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
अशा मोजक्या शब्दात महात्मा फुल्यांनी विद्येचे महत्व सांगितले आहे.
2. पुस्तक कोठे व कसे अडकले होते?
उत्तर – राहुलच्या निष्काळजीपणामुळे पुस्तक अडगळीतील कपाटाच्या मागे जमिनीपासून तीन फूट वर अधांतरी अडकूले होते.
3. वाचकांच्या चर्चेतून कोणते विचार ऐकून पुस्तकाला समाधान वाटते?
उत्तर - जीवनात अपार दुःख भोगलेल्या माणसाची पुस्तकाच्या वाचनाने जीवन जगण्याची आशा पल्लवित होते. विचार वाचकांच्या चर्चेतून जेव्हा पुस्तकाच्या कानावर पडतात तेंव्हा पुस्तकाला समाधान वाटते.
4. पान फाटले की पुस्तकाला कोणत्या प्रकारच्या वेदना सहन लागतात?
उत्तर – पुस्तकाचे एखादे पान फाटले की माणसाचा एखादा वयाव तुटल्यावर जशा वेदना होतात त्याप्रकारच्या वेदना पुस्तकाला होतात.
5. पुस्तकाचे संरक्षण कसे कराल?
उत्तर – पुस्तक वाचताना व्यवस्थित हाताळले पाहिजे.थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी त्याला पेपरचे कव्हर घालावे.शक्य झाल्यास प्लॅस्टीक कव्हर घातले पाहिजे.म्हणजे पाऊस वाऱ्यापासून चांगले संरक्षण होते. अशा प्रकारे पुस्तकाचे संरक्षण करू.
6. पुस्तकाची इच्छा कोणती असते?
उत्तर – आज दूरचित्रवाणीच्या रंगीबेरंगी जगात गुरफटलेल्या माणसाला वाचनाची आवड लागावी व माझ्यातील विचारांनी माणसांच्या जीवनात बदल व्हावा आणि वाचाल तर वाचाल हे डॉ. आंबेडकरांचे म्हणणे सार्थ ठरावे अशी पुस्तकाची इच्छा असते.
ई.खालील वाक्ये कोणी म्हटली ते सांगा.
1. “विद्येविना मति गेली । मति विना नीति गेली ।"
उत्तर – वरील वाक्य महात्मा जोतीबा फुलेंनी म्हटले आहे.
2. "पुस्तक नसलेले घर म्हणजे खिडक्या नसलेली खोली”
उत्तर – वरील वाक्य जॉन रस्किन यांनी म्हटले आहे.
3."नरकातही मी पुस्तकाच्या सहाय्याने स्वर्ग निर्माण करीन"
उत्तर – वरील वाक्य लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे.
4. “राहुलच्या निष्काळजीपणामुळे मला आज अडगळीत पडाव लागलय”
उत्तर – वरील वाक्य पुस्तकाने म्हटले आहे.
उ. खाली दिलेल्या शब्दांचे विरुध्दार्थी शब्द पाठात आले आहेत. ते शोध व लिही to
1.नरक × स्वर्ग
2.अस्वच्छ × स्वच्छ
3.सुख × दु:ख
4.मरण × जगणे
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा