2022-23 शैक्षणिक वर्षात ‘विद्या प्रवेश - अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमांचे’ शाळेमध्ये परिणामकारकरित्या अंमलबजावणी करणे विषयी...
दि. २७.०६.२०२२
उल्लेख:1. ದಿನಾಂಕ:13-6-2022ರಂದು ಜರುಗಿದ 'ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ' ಉಪಕ್ರಮದ ಎರಡನೇ ಕೋರ್ ಸಮಿತಿ ಸಭಾ ನಡಾವಳಿ (ಕ್ರಮ ಸಂಖ್ಯೆ:26).
2. ರಾಜ್ಯ ಯೋಜನಾ ನಿರ್ದೇಶಕರ ಕಛೇರಿ, ಸಮಗ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಕರ್ನಾಟಕದ ವತಿಯಿಂದ ವಿದ್ಯಾಪ್ರವೇಶ ಮತ್ತು ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅನುಷ್ಟಾನಾತ್ಮಕ ಮಾರ್ಗಸೂಚಿ ದಿನಾಂಕ 08:04.05.2022.
3. ನಿರ್ದೇಶಕರು, ಡಿಎಸ್ಇಆರ್ಟಿ ವತಿಯಿಂದ ಹೊರಡಿಸಿದ ಮಳೆಬಿಲ್ಲು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅನುಷ್ಟಾನ ಸುತ್ತೋಲೆ ದಿನಾಂಕ:13.05.2022.
4. ನಿರ್ದೇಶಕರು, ಡಿಎಸ್ಇಆರ್ಟಿ ವತಿಯಿಂದ ಹೊರಡಿಸಿದ ಪೂರ್ವ ಸಿದ್ಧತಾ ಅವಲೋಕನ ಚಟುವಟಿಕೆಗಳ ಜ್ಞಾಪನ ದಿನಾಂಕ:19.05.2022.
कोविड-19 मुळे राज्यातील सर्व शाळेमध्ये भौतिक वर्ग निरंतरपणे चालू नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती प्रतिकूल परिणाम झालेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात निर्माण झालेले अंतर भरून काढण्यासाठी व पुढील वर्गातील शैक्षणिक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी 1ली ते 9वी इयत्तांच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला चालना देण्यासाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये ‘विद्याप्रवेश’ आणि ‘अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रम’ (Learning Recovery Programme) आयोजित करण्यात आले आहे.
‘विद्याप्रवेश’ आणि ‘अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रम’ या उपक्रमांचे प्रमुख अंश खालीलप्रमाणे -
👉इयत्ता पहिली ते तिसरी वर्गासाठी सुरुवातीचे तीन महिने विद्या प्रवेश उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक शिक्षण विभागाच्या वेबसाईटवरती शिक्षक मार्गदर्शिका तसेच विद्यार्थी अध्ययन पुस्तिका यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे.
👉विद्या प्रवेश आणि अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन सूचना जिल्हास्तरावरती सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
👉उल्लेख 3 आणि 4 नुसार चौथी ते नववी इयत्तासाठी इंद्रधनुष्य कार्यक्रम तसेच पूर्व सिद्धता अवलोकन कृती याविषयी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक DSERT कडून काढण्यात आलेले आहे.
वरील सर्व माहिती शाळेना समजण्यासाठी आतापर्यंत शिक्षण विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाच्या साहित्याचे मुद्रण आणि त्यांचा पुरवठा या कार्यांची प्रगती अंतिम टप्प्यात आहे.यादृष्टीने अध्यन पुनर्प्राप्ती कोर समितीच्या सदस्यांच्या सूचनेनुसार तसेच उल्लेख (1) नुसार अध्ययन पुनर्प्राप्तीचे मुद्रित साहित्य शाळांना पोहोचेपर्यंत मुलांचे अध्ययन वेळ आणि संधी यांना प्राधान्य देऊन अध्ययन/अध्ययनांश आणि अध्ययन निष्पत्ती यांना संबंधित अभ्यासाच्या कृती घेणे आवश्यक आहे.म्हणजे आतापर्यंत अध्ययन पुनर्प्राप्ती प्रशिक्षण माध्यमातून सर्व शिक्षकांना सांगितल्याप्रमाणे सद्याच्या कालावधीत ज्या अध्ययन निष्पत्ती पूर्ण करावयाच्या आहेत त्यावर आधारित अध्ययन पत्रकांचा मात्र विचार करून खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.. : -
देणगीदार/सीएसआर अनुदान उपलब्धतेनुसार प्रत्येक विद्यार्थ्यानुसार किंवा एका इयत्तेसाठी शक्य तितक्या जास्त संख्येत विषयानुसार अध्ययन पत्रकांचे झेरॉक्स करून विद्यार्थ्यांच्याकडून अध्ययन सराव कृती सदर झेरॉक्स केलेल्या अभ्यास पत्रकावरती किंवा वहीमध्ये करून घेणे.
शाळेमध्ये उपलब्ध शाळा अनुदान,SDMC अनुदान इत्यादी कोणतेही शासकीय अनुदान शिल्लक असल्यास एका इयत्तेला किंवा विभागाला एका विषयाची किमान एक प्रति झेरॉक्स करून सदर प्रतीच्या सहाय्याने सर्व मुलांच्याकडून त्यांच्या वहीमध्ये अध्ययन कृती करून घेण्यासाठी वर्गशिक्षकांनी प्रयत्न करणे.
तसेच या उपक्रमाशी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून वरील सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अध्ययन कृती पूर्ण करून घेण्यास सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांना सूचना देणे विषयी सर्व जिल्ह्याचे निर्देशक आणि अभिवृत्ती यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
अधिकृत परिपत्रक खालीलप्रमाणे -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा