/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

1st Std Admission Age Crateria

          

विषय - इयत्ता पहिली प्रवेशासाठी मुलांची वयोमर्यादा निःश्चीत करणेबाबत....

        2016-17 या शैक्षणिक वर्षापासून आर टी ई कायदा 2009 मधील सेक्शन 12 (1) C अंतर्गत अनुदानरहित तसेच अल्पसंख्यांक संस्थेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश संबंधी LKG साठी 3 वर्षे 10 महिने ते 4 वर्षे 10 महिने तसेच पहिलीसाठी 5 वर्षे 10 महिने ते 6 वर्षे 10 महिने वयोमर्यादा निश्चित करण्याचा आदेश सरकारने दिला होता.

 
आयुक्त,सार्वजनिक शिक्षण विभाग बेंगलोर यांच्या पूर्व प्राथमिक तसेच प्राथमिक शाळेच्या पहिली वर्गाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी कर्नाटक शिक्षण कायदा 1983 नियम 20 अन्वय त्या शैक्षणिक वर्षातील जून 1 रोजी पूर्व प्राथमिक (LKG) साठी 3 वर्षे 10 महिने तर इयत्ता पहिलीसाठी 5 वर्षे 10 महिने अशा क्रमाने वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती.

सार्वजनिक शिक्षण विभाग आयुक्त यांच्या दिनांक 18.01.2017 च्या सुधारित आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2018-19 वर्षापासून सरकारी अनुदानित,अनुदानरहित शाळेतील इयत्ता पहिली प्रवेश संबंधी शैक्षणिक वर्षाच्या जून 1 तारखेला 5 वर्षे 10 महिने वय पूर्ण झाले पाहिजे असे निश्चित करण्यात आले होते.

Government Order No : EP 260 PGC 2021: Bangalore Dated :26-07-2022.
प्रस्तावातील नोंदीनुसार Government Order No: ED 708 PGC 2017 Dated: 23-05-2018 and Government letter No: ED 60 PGC 2020 Dated: 20-03-2020 मागे घेण्यात आले आहेत व R.T.E. Act 2009 आणि सक्तीचे शिक्षण कायदा नियम 2012, अनुसार शैक्षणिक वर्षाच्या जून एक तारखेला 06 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच इयत्ता पहिली मध्ये दाखल करण्यास वयोमर्यादा निश्चित करण्यात आले आहे असे नवीन आदेशात म्हटले आहे.
SEE THE BELOW CIRCULAR
👇👇👇👇👇👇👇👇👇
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा