इयत्ता - आठवी
विषय - समाज विज्ञान
अभ्यासक्रम २०२4 नुसार
विभाग -इतिहास
4. जगाच्या प्राचीन संस्कृती
पाठावरील प्रश्नोत्तरे
स्वाध्याय
I. खालील जागी
योग्य शब्द भरा.
1. हिरोग्लाफिक्स म्हणजे पवित्र लिपी होय.
2. इजिप्तच्या राजांना फरोह असे म्हणत.
3. ग्रीकांनी मेसापोटेमियाचा उल्लेख बॉबिलोनिया असा केला
4. अमुराईटसचा प्रसिद्ध राजा राजा हम्मुरबी हा होय.
5. प्रिन्सेप म्हणजे राज्याचा प्रथम नागरिक
6. रोमनांची भाषा लॅटिन.
7. टेक्सकोको हे मेक्सिको मधील एक सरोवर होय.
8. इन्का संस्कृतीच्या लोकांचे आराध्य दैवत सूर्यदेव
अ
ब
I. हो-यांग-हो नदी A. मेसापोटेमिया
II.क्युनफॉर्म लिपी B. अमुराईटसचा राजा
III. क्लिओपाट्रा C.शांघ
IV. हम्मूरबी D. चीन
V. चिनी वंश / घराणे E. शेवटची इजिप्शियन राणी
उत्तर –
I. हो-यांग-हो नदी D. चीन
II.क्युनफॉर्म लिपी A. मेसापोटेमिया
III. क्लिओपाट्रा E. शेवटची इजिप्शियन राणी
IV. हम्मूरबी B. अमुराईटसचा राजा
V. चिनी वंश / घराणे C.शांघ
III. थोडक्यात उत्तरे लिहा.
9. कोलंबियातील प्राचीन संस्कृती कोणकोणत्या होत्या?
उत्तर – माया,आस्टेक व इन्का या प्राचीन
कोलंबियातील संस्कृती होत्या.
10. माया कोण
होते?
उत्तर – मेक्सिकोच्या युकटेन भागातील अमेरिकन-भारतीय
आदिवासीना माया असे म्हणत.
11.मम्मीजचे
जतन कसे केले जात असे ?
उत्तर – इजिप्शियन लोक प्रेतावर रसायनाचा
वापर करून प्रेत पातळ कापडात गुंडाळून ठेवत असत. अशाप्रकारे जतन करून ठेवलेल्या
प्रेताला 'मम्मी' म्हटले जाते.या मम्मी विशिष्ट शेवपेटीत घालून थडग्यात ठेवत.ही थडगी म्हणजेच
पिरॅमिडस होय.यामध्ये प्रेतासोबत दैनंदिन गरजेच्या वस्तू आचारी व न्हावी यांच्या
प्रतिमा ठेवल्या जात असत.
12. पिरॅमिडसची
माहिती लिहा.
उत्तर – मम्मी विशिष्ट सेवा पेटीत घालून
थोडक्यात ठेवत ही थडगी म्हणजेच पिरॅमिडस होय.यामध्ये प्रेतासोबत दैनंदिन गरजेच्या
वस्तू आचारी व न्हावी यांच्या प्रतिमा ठेवल्या जात असत.सुरुवातीला ही थडगी पर्वत
शिलांमध्ये होऊन तयार केली जात असत.पण इजिप्शियन जसे उत्तरेकडे सरकले त्यामुळे
तेथील वाळवंटात त्यांना पिरॅमिड थडगी बांधावी लागली.या थडग्यावर मोठ-मोठ्या
दगडांचा वापर करून उंच मनोरे बांधले जात असत.राजे आणि श्रीमंत लोकांच्या मध्ये उंच
उंच थंडी बांधण्याची स्पर्धा असावी.
13. हो-यांग-हो
नदीला 'चीनचे अश्रू' का म्हणतात ?
उत्तर – प्राचीन संस्कृत्यांची वैशिष्ट्ये
म्हणजे या सर्व संस्कृती नदीकाठांवर उदयास आल्या.चिनी संस्कृती पण याला अपवाद
नाही.पण ज्या नदीच्या काठावर म्हणजेच हो-यांग-हो च्या काठावर चीन संस्कृती
उत्कर्षाला आली. पण त्या नदीला येणाऱ्या महापुरामुळे त्या नदीचे पात्र बदलत असे व
हजारो घरे शेती नाश पावत असत.अनेक कालवे या पुरामुळे उध्वस्त होत.म्हणून तिला
मात्र 'चीनचे अश्रू' म्हटले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा