/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

9th MARATHI 4. FATAKA (4.फटका)

 

४. फटका

 - अनंत फंदी

परिचय :अनंत घोलप (1744-1819) हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे राहणारे उत्तर पेशवाईतील लोकप्रिय शाहीर. पिढीजात सराफी व्यवसाय सोडून ते तमाशामध्ये रममाण झाले. पुढे अहिल्याबाई होळकरांच्या उपदेशामुळे तमाशाचा त्याग करून ते कीर्तनाकडे वळले. आणि प्रसिध्द कीर्तनकार म्हणून त्यानी लौकिक मिळविला. त्यांचे सात पोवाडे व काही थोड्या लावण्या उपलब्ध आहेत. त्यांचे फटके आजही रसिकांना आवडतात. ‘माधवग्रंथ' किंवा 'माधवनिधनकाव्य' ही त्यांची रचना प्रसिद्ध आहे.

'फटका' या रचना प्रकारात नीतीच्या उपदेशाचे फटके सांगून जनर यांना सरळमार्गी आयुष्य व्यतीत करण्याचा उपदेश केलेला आहे. हा फटका म. ना. अदवंत यांच्य जिण या पुस्तकातून घेतला.

शब्दार्थ :

विटणे - कंटाळणे

नौबद – नगारा

  द्वैत - दुजाभाव, भिन्नता

बिकट - कठीण

उलाढाली - उचापती, भानगडी, उपद्व्याप

बोज - मान, रुबाब

हिमायत - पाठबळ, आश्रय, आधार

निखालस खोटा बोल - संपूर्णपणे निर्विवाद असत्य भाषा

वर्म - उणीव असलेली गोष्ट

व्यय-खर्च

कातरु नको- संकोच करू नको

खुशामत - स्तुती

 

टीपा :

फटका लोकांना नीतीच्या उपदेशाचे फटके देणारी काव्य रचना. हा शाहिरी वाङ्मयाचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. त्यात लौकिक जीवन यशस्वी व्हावे म्हणून अत्यंत परखडपणे विचार मांडलेले असतात. उपदेशाच्या भूमिकेतून फटक्याचे लेखन झालेले असते. आवेशपूर्ण, जोरकस भाषेत 'फटक्या'ची रचना केलेली असते.

स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) यांच्या उपदेशामुळे अनंत फंदी कीर्तनाकडे वळले.
(अ) संत नामदेव

(ब) बहिणाबाई

(क) मुक्ताबाई

(ड) अहिल्याबाई

उत्तर - (ड) अहिल्याबाई


(आ) कशाची भाजी भाकरी बरी असे अनंत फंदी म्हणतात.

(अ) जोंधळ्याची

(ब) तांदळाचीफ

(क) कष्टाची

(ड) मक्याची

उत्तर -(क) कष्टाची

(इ) कशाची चोरी करायची नाही असे अनंत फंदी म्हणतात.

(अ) सोन्याची

(ब) पैशाची

(क) तूपसाखरेची

(ड) लाडूची

उत्तर -(क) तूपसाखरेची

(ई) कोणावर रुसू नको असे अनंत फंदी म्हणतात.

(अ) मित्रावर

(ब)पत्नीवर

(क) मायबापावर

(ड)मुलांवर

उत्तर -(क) मायबापावर

(उ) कोणाची मैत्री नको असे अनंत फंदी म्हणतात.

(अ) शहाण्याची

(ब) चोराची

(क) भिकाऱ्याची

(ड) मूर्खाची

उत्तर -(ड) मूर्खाची

 

प्रश्न 2 रा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.कवी कोणता मार्ग सोडू नको असे म्हणतात?

उत्तर -कवी धोपट मार्ग सोडू नको असे म्हणतात .

2.जगाचे बोलणे कशासाठी घ्यावे लागते?

उत्तर -नास्तिक पणात शिरून जगाचे बोलणे घ्यावे लागते

3.कोणाला जामीन होऊ नकोस असे सांगतात?

उत्तर -कर्ज काढणाऱ्याला जामीन होऊ नकोस असे म्हणतात .

4.कोणत्या कामासाठी पैसे खर्च करायला कवी सांगतात?

उत्तर -सत्कार्यासाठी पैसे खर्च करायला कवी सांगतात .

5.नौबदीचा डंका कधी वाजेल?

उत्तर -नौबदीचा डंका सत्कार्य केल्यानंतर वाजेल .

प्रश्न 3 रा खालील प्रश्नांची दोन किंवा तीन  वाक्यात उत्तरे लिहा.

1.अंगी कोणते गुण असावेत व कोणते गुण नसावेत?

उत्तर -अंगी नम्रता असावी प्रामाणिकपणा असावा.कधी कोणावर राग धरू नये.खोटे बोलू नये.नास्तिकपणात शिरून जगाचे बोलणे होऊ नये इत्यादी गुण अंगी नसावेत .

2.कवी कशाचा गर्व धरू नको असे सांगतात?

उत्तर -कवी संपत्तीचा गर्व करू नकोस.मिरवू नकोस.संपत्ती दोन दिवसाची असते तसेच मी मोठा आहे मी शहाणा आहे मी हुशार आहे असा गर्व धरू नको असे सांगतात .

 

प्रश्न 4 था संदर्भासह  स्पष्टीकरण

1.सुविचार कातरू नको  | सत्संगत अतरु नको ॥

संदर्भ - वरील ओळ फटका या कवितेतील असून ही कविता अनंत फंदी यांनी लिहिली आहे

स्पष्टीकरण- येथे कवी माणसाला उद्देशून सांगत आहेत की,मनातील चांगल्या विचार कधी अंतर देऊ नको.चांगल्याची संगत दुरावू देऊ नको.चांगले विचार घेऊन जग.असा कवी उपदेश करत आहेत.

2.बहुत कर्जबाजारी होऊनी । बोज आपला दवडू नको ॥

संदर्भ - वरील ओळ फटका या कवितेतील असून ही कविता अनंत फंदी यांनी लिहिली आहे .

स्पष्टीकरण- माणसाला उपदेश करताना आनंद फंदी म्हणतात की,अति कर्जबाजारी होऊन नकोस आणि बोजा करून घेऊन वेळ शक्ती वाया घालवू नकोस असे कवी सांगतात .

प्रश्न 5वा खालील प्रश्नांची पाच ते सहा  ओळीत उत्तरे लिहा.

1. निंदा व स्तुती याबद्दल कवीने काय म्हटले आहे?

उत्तर -निंदा व स्तुती याबद्दल बोलताना कवी म्हणतात की,दुसऱ्याची निंदा करू नये.काम करावे .स्वतःचं हित व्हावं व दुसऱ्याचा तोटा अशी अपेक्षा कधीच करू नये.शहाण्या माणसाची संगत करावी व मुर्खाची सोडून द्यावी .

2.या फटक्यात कवीने कोणते सदगुण सांगितले आहेत?

उत्तर -दुसऱ्याचे पैसे कधी बुडवू नयेत.संपत्तीचा गर्व धरू नये.मोठेपणा मिरवू नये.एकापेक्षा एक लोक जगामध्ये थोर आहेत.गरिबाला कधीही हीनवू नये.आपल्या जवळ चांगले गुण ठेवावेत.असे सद्गुण या फटक्यात कवीने सांगितले आहेत .

प्रश्न 6 वा खालील प्रश्नांची आठ ते दहा  ओळीत  उत्तरे लिहा.

1.फटका या कवितेत कवीने काय करू नये असे सांगितले आहे?

उत्तर -धोपट मार्ग सोडू नये उगाचभटकत फिरू नये खोटे बोलू नये कधीही कुणावर राग धरू नये अधर्म करू नये दूर एकटेच बसू नये पोटासाठी उलाढालच्या करू नये कर्ज काढणाऱ्याला जामीन होऊ नये मूर्खांची मैत्री करू नये देवाला विसरू नये असे सांगितले आहे .बिकट वाट व ही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको.

 

व्याकरण -

(अ)       कवितेतील अनुप्रास अलंकाराचे एक उदाहरण लिहा.

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडु नको ।

(आ) विरुद्धार्थी शब्द लिहा.

नास्तिक Xआस्तिक

राग xप्रेम

उणे Xधुणे

धर्म Xअधर्म

निंदा Xस्तुती

मूर्ख Xशहाणा

(इ) खालील शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

सत्कर्म – चांगले कर्म  

तृतीय तत्पुरुष समास

स्वहित – स्वतःचे हित

षष्ठी तत्पुरुष समास

तूपसाखर – तूप आणि साखर

इतरेत्तर द्वंद्व समास

सुविचार – चांगला विचार

सप्तमी तत्पुरुष समास

हरिभजन – हरीचे भजन

षष्ठी तत्पुरुष समास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा