/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

9th MARATHI 6.ENAKSHIMIA ANI VAGHIN एनाक्षीमिया आणि वाघीण

   

एनाक्षीमिया आणि वाघीण
   लेखक - मारुती चितमपल्ली

 

स्वाध्याय :

प्र 1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा

(अ) एनाक्षीमिया कोठे राहात असे ?

(अ) झोपडी

(ब) घर

(क) डोली

(ड) गुहा

उत्तर - (अ) झोपडी

(आ) पाखरे कशामुळे जखमी होत ?

(अ) उन्हामुळे

(ब) पावसामुळे

(क) शिकाऱ्यांमुळे

(ड) गारांच्या वर्षावामुळे

उत्तर - (ड) गारांच्या वर्षावामुळे

(इ) जानू गोंड कोठे अडकला ?

(अ) पावसात

(ब) गर्दीत

(क) जत्रेत

(ड) डोंगरावर

उत्तर – (अ) पावसात

   

प्रश्न 2 रा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा
1.एनाक्षीमिया आणि वाघिणीची गोष्ट कोणी कोणास सांगितली?
उत्तर - एनाक्षीमिया आणि वाघिणीची गोष्ट बाबा आमटे यांनी मारुती चित्तमपल्ली व पु.ल.देशपांडे यांना सांगितली .
2.मिया गरोदर स्त्रीची मदत कशी करत असे?
उत्तर - मिया खराटा घेऊन गरोदर स्त्रीचे सारे अंगण झाडून द्यायचा विहिरीतील पाणी पोहऱ्याने काढून द्यायचा.
3.जानू गोंड जंगलात का गेला होता?
उत्तर - जानू गोड जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेला होता .
4.जानूला झाडाचा आसरा का घेता आला नाही?
उत्तर - विजेच्या आगीचा गोळा एखाद्या झाडावर पडला की,ते झाड समोरच स्मसात व्हायचे.त्यामुळे जानूला झाडाचा आसरा घेता आला नाही .
5.वाघीण व मियाच्या कबरी कोठे आहेत?
उत्तर – चंद्रपूर - मूल रस्त्याकडेला गावच्या सीमेवर कबरी आहेत .

 


प्रश्न 3 रा दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा
1. मध्यरात्रीनंतर गावकरी मी याच्या झोपडीकडे का फिरत नसत?
उत्तर - मियाच्या झोपडीजवळ मध्य रात्रीनंतर जंगलातील एक वाघीण त्या धुनीजवळ येऊन बसे.मिया तिच्याशी तासन् तास बोले.वाघीण सारे एक चित्ताने ऐके आणि हेच जेव्हा गावकऱ्यांना समजले तेव्हापासून मध्यरात्रीनंतर गावकरी मियाच्या झोपडीकडे फिरकत नसत .
2.जानूगोंड कोणत्या संकटात अडकला?
उत्तर - अवकाळी पाऊस चालू झाला होता.जिकडे तिकडे आभाळ भरून आलेले होते.ढगाचा कडकडाट विजांची चमक याबरोबर वादळ वारे सुटले होते.विजेच्या आगीचा गोळा एखाद्या झाडावर पडला की,ते झाड समोरच जळून भस्मसात व्हायचे.त्यामुळे जानूगोंडाला झाडाचा आसरा घेता येईना अशा संकटात जानूगोंड अडकला .
संदर्भासहित स्पष्टीकरण करा
1.मियाला जंगली प्राणी वश आहेत ही बातमी साऱ्या दशक्रोशीत पसरली
संदर्भ - वरील ओळ एनाक्षीमिया आणि वाघीण या पाठातील असून हा पाठ मारुती चितमपल्ली यांनी लिहिला आहे हा पाठ सुवर्ण गरुड या कथासंग्रहातून घेतला आहे.
स्पष्टीकरण- मध्यरात्रीनंतर मियाच्या झोपडीजवळ एक वाघीण येई.मियाच्या आणि वाघिणीच्या खूप गप्पा होत असत.हे जेव्हा गावकऱ्यांना समजले तेव्हा त्यांना मियाला जंगली प्राणी वश आहेत असे वाटू लागले.

 

2.त्यांनी जानूला कपडे काढायला सांगितले त्याच्या सर्वांगाला धुनीतली राख फासली
संदर्भ -  वरील ओळ एनाक्षीमिया आणि वाघीण या पाठातील असून हा पाठ मारुती चितमपल्ली यांनी लिहिला आहे हा पाठ सुवर्ण गरुड या कथासंग्रहातून घेतला आहे.
स्पष्टीकरण- ज्यावेळी जानू जंगलात अडकतो.तेव्हा तो मियाच्या झोपडीजवळ जातो.तेव्हा मध्य रात्र झाली होती.मियाला चिंता पडली की,जानूला अपरात्री परत पाठवणे योग्य नाही. जर वाघिणीची व जानूची भेट झाली तर वाघीण जानूवर हल्ला करेल.म्हणून मियाने वरील युक्ती सुचवली आहे .

3.काय केलेस मिया माझ्यासारख्या साध्या माणसाचा जीव वाचवण्याकरिता स्वतःचे प्राण दिलेस
संदर्भ - वरील ओळ एनाक्षीमिया आणि वाघीण या पाठातील असून हा पाठ मारुती चितमपल्ली यांनी लिहिला आहे हा पाठ सुवर्ण गरुड या कथासंग्रहातून घेतला आहे.
स्पष्टीकरण- ज्यावेळी जानू संकटात अडकतो त्यावेळी तो मिया च्या झोपडी जवळ येतो तेव्हा मध्य रात्री झाली होती वाघिणीच्या येण्याची वेळ झाली होती जर वाघिणीची व मी याची भेट झाली तर वाघीण जानवर हल्ला करेल म्हणून मी आणि जानूचे कपडे स्वतः घातले व वाघिणीला सामोरे गेला वाघिणीने त्याला ओळखले नाही व तिने मी यावर हल्ला केला त्यात मी या गत प्राण झाला हे सर्व जानुगोंड दुसऱ्याच पहात होता त्यावेळी त्यांनी वरील वाक्य म्हटले आहे .
पाच सहा वाक्यात उत्तरे लिहा
1.जानूला वाचवण्यासाठी मियाने काय केले?
उत्तर - मियाने जानूला कपडे काढायला सांगितले.त्याच्या सर्वांगाला धुनीतली राख फासली. त्यामुळे शरीराचा वास प्राण्यांना येत नाही.स्वतःची कफनी जानुच्या अंगावर घातली.जानूचे ओले कपडे धुनिवर सुकवून स्वतः घातले व रस्त्याने येणाऱ्या वाघिणीला सामोरे जावे म्हणून मिया जंगलातून चालू लागला .
2.मियाचा मृत्यू कसा झाला?
उत्तर - मिया वाघिणीची सावट एकाग्रतेने ऐकू लागला.अपेक्षेप्रमाणे वाघिणीची वाटेतच भेट होते परंतु दुरूनच वाघीण आपला राग व्यक्त करते हे पाहून मी याला आश्चर्य वाटते वाघिणीने मी याला ओळखले नाही आणि मी यावर कडकडून हल्ला केला त्यात मिया गतप्राण झाला.

 

भाषाभ्यास :

(अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

मोर्चा वळविणे - माघार घेणे.

समोरच्या व्यक्तीची तयारी पाहून बंडूने आपला मोर्चा वळवला.

 

सामोरे जाणे – सामना करणे

माझ्यावर आलेल्या संकटाला मी सामोरा गेलो.

 

गर्भगळीत होणे – अतिशय घाबरणे

समोर मोठा साप पाहून मी गर्भगळीत झालो.

 

कोंबडा अरवणे – सकाळ होणे

कोंबडा अरवल्यावर गावातील लोक जागे होतात.

 

(आ) विरुद्धार्थी शब्द लिहा.

आकर्षण × अनाकर्षण

अपरिचित × परिचित

निष्क्रिय × सक्रिय

क्लेशदायक × सुखदायक

 


वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करा... 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा