सूचना – हे सर्व नमुने इंग्रजी व मराठीमध्ये असून हे फक्त आपल्या माहितीसाठी व संदर्भासाठी बनवलेले आहेत.तरी कृपया शिक्षकांनी हे सर्व नमुने कितपत योग्य आहेत याची खात्री करून घेऊन योग्य वाटल्यासच वापरावेत.
👉2022-23 या वर्षात मूल्यमापनासाठी मूल्यमापन व संकलित मूल्यमापनाचे नियोजन करणे.
प्रथम आकारिक मूल्यमापन FA-1 - संबंधित इयत्तेचे विषयानुसार निर्धारित LO (Learning Outcomes- अध्ययन निष्पत्ती)पैकी शेकडा 25 टक्के अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे. याप्रकारे उर्वरित इतर FA मूल्यमापन करताना शेकडा 25 अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे.याला संबंधित या अध्ययन पत्रकातील पूर्ण केलेल्या कृतींवर आधारित ग्रेड देऊन त्यांची नोंद ठेवणे.उदा.एकाविद्यार्थ्याने 8 कृतीमध्ये एकूण किती टक्के कृती पूर्ण केल्या आहेत हे ठरवून.त्यावर आधारित ग्रेड देणे.
👉विद्यार्थी संचयिका (CHILD PROFILE) मध्ये संबंधित अध्ययन पत्रके ठेवणे.याप्रमाणे FA 1,2,3,4 मध्ये ग्रेडची नोंद करून वार्षिक निकालांमध्ये त्यांचा समावेश करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा