भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त "हर घर तिरंगा" उपक्रम राबविणेविषयी...
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील असंख्य नेते,क्रांतिकारक,देशभक्त तसेच स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण करावे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.स्वातंत्र्य लढ्यातील सर्व देशभक्तांना स्मरण करून त्यांनी स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने 'आजादी का अमृत महोत्सव' अर्थात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावर्षी
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत याची औचित्य साधुन केंद सरकार ‘हर घर तिरंगा’ या घोषवाक्याने देशातील प्रत्येक
घरावर तिरंगा ध्वज फडकावून 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 पर्यंत हर घर तिरंगा अभियान
परिणामकारकपणे राबविण्यात यावे.
या अंतर्गत केंद्र सरकारच्या उल्लेख (1) पत्रामध्ये स्वातंत्र्याचा अमृत
महोत्सव हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत.या उपक्रमा अंतर्गत सर्व सरकारी/निम सरकारी/ स्व सहाय्य संघ/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था/शाळा/कॉलेजची
मुले/इतर सर्व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी हर घर तिरंगा अभियानामध्ये स्वयंप्रेरणेने भाग घ्यावा यासाठी योग्य क्रम हाती घेणेविषयी
मुख्य कार्यदर्शी कर्नाटक सरकार यांनी निर्देश दिले आहेत.
तरी राज्यातील सरकारी/निम सरकारी/ स्व सहाय्य संघ/सहकारी संस्था/ सरकारी,अनुदानित, अनुदानरहित शाळा,कॉलेज चे
शिक्षक,कर्मचारी,शिक्षण विभागातील विविध स्तरातील सर्व पदाधिकारी, तसेच त्यांच्या
कुटुंबीयांनी हर घर तिरंगा अभियानामध्ये स्वयंप्रेरणेने सक्रिय सहभाग घेऊन 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर तिरंगा अभियान यशस्वीपाने पार पाडण्यासाठी खालील नियम व
मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे..
👉केंद्रीय गृह विभाग यांच्या The Flag Code of India 2002 (as amended in 2021) च्या दुरुस्तीनुसार हाताने
कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत,पॉलिस्टर,लोकर,सिल्क,खादीपासून
बनवलेला राष्ट्रध्वज पालक,विद्यार्थी यांनी
स्वयंप्रेरणेने खरेदी करून फडकवावा.
राष्ट्रध्वजाचा आदर्श आकार आणि किंमत खालीलप्रमाणे-
1.
राष्ट्रध्वज आकार 20" × 30" रु. 25.00
2.
राष्ट्रध्वज आकार 16"
× 24"
रु. 18.00
3.
राष्ट्रध्वज आकार 6" × 9" रु. 9.00
राष्ट्रध्वज संहिताविषयी थोडक्यात माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पहा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
शाळा/महाविद्यालयीन स्तरावर, शिक्षक यांनी खालीलप्रमाणे नियोजन करावे.
1. 11.08.2022 ते 15.08.2022 या कालावधीत जेथे शक्य असेल तेथे कोविड-19 रोगाचा प्रसार विरूद्ध "प्रभात फेरीच आयोजन करावे.
2. II.08.2022 ते 17.08.2022 पर्यंत दररोज शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकत्र करून राष्ट्रध्वजाच्या वैशिष्ट्याबद्दल माहिती देणे.
3. विद्यार्थ्यांना रोजच्या प्रार्थनेदरम्यान "हर घर तिरंगा" अभियान कार्यक्रमाबद्दल जागरूकता आणि प्रेरणा निर्माण करणे.
5. शाळेच्या सूचना फलकावर 'हर घर तिरंगा' या मोहिमे अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांचा तपशील प्रकट करणे.
6. “हर घर तिरंगा” मोहिमे अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रध्वजावर आधारीत चित्रकला स्पर्धा आयोजित करणे व राष्ट्रध्वज संग्रह करणे.
7. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालकांना त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी प्रोत्साहित करणे.
8 विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी "हर घर तिरंगा"मोहीम कार्यक्रमात भाग घेऊन राष्ट्रध्वजासह सेल्फी काढून (selfie with Tiranga) ते सेल्फी https://harghartiranga.com/ या वेबसाईट वरती अपलोड करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा