/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

8th SS Textbook Solution Lesson 19.दैनंदिन जीवनात समाजशास्त्र

   




 

इयत्ता - आठवी 

विषय - समाज विज्ञान 

माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - २०२२ सुधारित 

विषय - स्वाध्याय 

 

प्रकरण 19
दैनंदिन जीवनात समाजशास्त्र

I. रिकाम्या जागा योग्य शब्दानी भरा.
1. आपण आपल्या भावना संभाषण व देहबोलीतून व्यक्त करतो.

2. समाजशास्त्र कोणत्याही विषयाचा अभ्यास शंका कुशंका शिवाय करण्यास मदत करते.

3. दैनंदिन जीवनात आपला एकमेकांशी संबंध येतो.त्याला ................समाज जीवन असे म्हणतात.


II. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

4. दैनंदिन जीवनात समाजाचे स्थान काय हे जाणून घेण्यासाठी समाजशास्त्राचा आपल्याला कसा उपयोग होतो?

उत्तर - स्त्रिया या पुरुषांपेक्षा दुर्बल असल्याने त्या दुर्लक्षित राहतात.यासारखे विचार हे स्त्रियांबद्दलचा पूर्वग्रह दूषितपणा दाखवून देत नसून हे एक वैद्न्यानिक सत्य आहे.ज्ञान स्त्री आणि पुरुषांमध्ये भेद करत नाही.
    या उदाहरणाचा अर्थ असा आहे की,सामान्य ज्ञान काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास अपयशी ठरले, जरी ते आपल्या दैनंदिन जीवनात मदत करत असले तरीही अशावेळी समाजशास्त्र आपल्याला मदत करते.समाजशास्त्रज्ञानी स्त्री जातीचा अभ्यास करून त्या शास्त्रीयदृष्ट्या पुरुषां इतक्याच खंबीर आणि कर्तृत्वान आहेत हे सिद्ध केले आहे.
        वरील उदाहरणावरून असे स्पष्ट होते की,दैनंदिन जीवनाला आवश्यक असणारी माहिती समाजशास्त्रातून प्राप्त होते.कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना त्याबद्दल शंका कुशंका असू नयेत.
5. भाषेचे महत्व सांगणारी उदाहरणे द्या ?

उत्तर - समाजजीवनात भाषा आणि खाणाखुणांचा वापर करून एकमेकांशी संभाषण केले जाते.संभाषणाद्वारे एकमेकांच्या विचार आणि वर्तणुकींवर प्रभाव पडतो. संभाषणाशिवाय जीवन अशक्य आहे.भाषेवर परिसराचा प्रभाव पडतो.वातावरणाला योग्य असलेली भाषाच बोलणे सोयीचे असते.भाषेशिवाय संभाषण साधने कठीण आहे.

6. कर्तव्याची जाण म्हणजे काय ?

उत्तर - प्रत्येक व्यक्ती आपले कर्तव्य पार पाडत असते. यांनाच कर्तव्याची जाण असे म्हटले जाते.
III. खालील प्रश्नांची चार ते पाच वाक्यात उत्तरे द्या.

7. भाषा आणि समाज यामधील संबंध स्पष्ट करा.

उत्तर -दररोजच्या जीवनात आपला अनेकांशी संबंध येतो.यालाच परस्पर पूरक समाज जीवन असे संबोधतात.समाज जीवनात भाषा आणि खाणाखुणांचा वापर करून एकमेकांशी संभाषण केले जाते.संभाषणाद्वारे एकमेकांच्या विचार आणि वर्तणुकीवर प्रभाव पडतो.
8. कर्तव्याची जाण उदाहरणासहित स्पष्ट करा.

उत्तर -जेव्हा तुम्ही हॉस्पिटलला भेट देता तेव्हा तुम्ही डॉक्टर आणि नर्सेसना पाहिले असेल.शरीर तपासणीनंतर डॉक्टर आवश्यक औषध उपचारांचा सल्ला देतात.नर्स रुग्णाला औषध देऊन डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांची देखभाल करतात.त्याप्रमाणे शिक्षक वर्गात येताच तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात.या प्रश्नातून तुम्ही घरी अभ्यास केला आहे अथवा नाही.हे ते जाणून घेतात.एखादा विषय कितपत समजला आहे.याचेही स्पष्टीकरण होते.

 

 आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे साठी येथे स्पर्श करा.. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा