/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

8th SS Textbook Solution Lesson 8. GUPT AND VARDHAN DINASTY आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 9. गुप्त व वर्धन घराणे)

   


 

इयत्ता - आठवी 

विषय - समाज विज्ञान 

माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - २०२२ सुधारित 

विषय - स्वाध्याय 

प्रकरण – 8 

गुप्त आणि वर्धन घराणे

1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. गुप्तांनी आपली कारकिर्द मगध या ठिकाणाहून सुरु केली.

2. पहिल्या चंद्रगुप्ताला महाराजाधिराज असे म्हटले जात असे.

3. कालिदासाचे प्रसिद्ध नाटक अभिज्ञान शाकुंतल हे होय.

4. विशाखादत्तची मुद्राराक्षस ही प्रसिद्ध साहित्यकृती होय.

5. शुद्रकाने मृच्छकटिक ही साहित्यकृती लिहिली.

6. वर्धन घराण्याचा संस्थापक पुष्यभुती हा होय.

 
II. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
7. दुसऱ्या चंद्रगुप्ताबद्दल माहिती लिहा.
उत्तर - दुसऱ्या चंद्रगुप्ताने समुद्रगुप्ताचे साम्राज्य वाढविले आणि स्थैर्य आणले.त्यांनी शकांचा पराभव करून पश्चिम भारत आपल्या अमलाखाली आणला.भारतातील अनेक घरान्यांशी वैवाहिक संबंध जोडले आणि तो प्रभावशाली झाला.त्याने विक्रमादित्य ही पदवी मिळवली.त्याची कारकीर्द ही त्याने केलेला लढायांपेक्षा साहित्य आणि कलेला दिलेल्या उत्तेजनामुळे स्मरणीय झाली आहे.प्रसिद्ध कवी कालिदास हा त्याच्याच काळातील होय.
8. गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे कोणती ?
उत्तर - हूणांच्या सतत आक्रमणामुळे गुप्तांचा ऱ्हास झाला. गुप्तांचे स्वतःचे सुसज्ज सैन्य नव्हते.मांडलिक राजे सैन्य पुरवित असत.त्यामुळे त्यांचे प्राबल्य वाढले.तेथील रहिवाशी,शेतकरी,कामगार आणि जमीन मालकांनी राज्यावर बंधने आणली.अशाप्रकारे समाजामध्ये अधिक बिकट परिस्थिती निर्माण झाली.
9. गुप्त कालीन प्रसिद्ध शास्त्रज्ञ कोण होते?
उत्तर - गुप्तकाळात अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होऊन गेले.ते खालील प्रमाणे.
धन्वंतरी - याला भारतीय वैद्यकशास्त्राचा जनक म्हणतात. यांनी आयुर्वेदिक शब्दकोश तयार केला.
चरक - चरकाने चरकसंहिता हे वैद्यशास्त्रातील पुस्तक लिहिले.
सुश्रुत- हा शल्यचिकित्सक होता.तो पहिला भारतीय शल्यचिकित्सक होता.
आर्यभट्ट - हा प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि गणित तज्ञ होता.बीजगणितावर प्रभुत्व मिळवणारा तो पहिला भारतीय होता.
वराहमिहीर- हा एक प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ होता.त्यांनी पंचसिद्धांतिका हा खगोलशास्त्रामधील ग्रंथ लिहिला. खगोलशास्त्रामधील हा ग्रंथ बायबल म्हणून ओळखला जातो.

 
10. वर्धनाचा राज्यकारभार कसा होता ?
राजाला राज्यकारभारात मंत्रिमंडळाची मदत होत असे.महासंधी विग्रह (मध्यस्थ),महाबलाधिकृत (महासेनापती),भोगपती (महसूल अधिकार) आणि दूत अशी नोकरशाहीची चौकट होती.राज्याचे प्रांतांमध्ये विभाजन केले होते.जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन होते.मांडलिक राजे खंडणी देत असत. ज्यावेळी राजा राज्य चालवण्यास असमर्थ झाला.त्यावेळी मांडलिकांचे वर्चस्व वाढवून ते स्वतंत्र झाले.

11. नालंदा विश्वविद्यालयाबद्दल माहीती लिहा.

उत्तर - नालंदा विश्वविद्यालय हे प्राचीन विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे.बुद्धानी नालंदा विद्यापिठाला भेट दिली होती.25 मीटर उंचीची बुद्धाची पितळीमुर्ती हर्षवर्धनाने नालंदा विद्यापिठाला देणगी दाखल दिली अशी नोंद आहे.नागार्जुन,दिन्नगा आणि धर्मपाल हे प्रसिद्ध विद्वान होते.चिनी प्रवासी ह्यू- एन-त्संगने नालंदा विद्यापिठाला भेट देऊन कांही काळ वास्तव्यही केले होते.त्याने आपल्या प्रवास वर्णनात सांगितले आहे की,या ठिकाणी स्तूप, चैत्यालय, विहार, विश्रामधाम आणि बसण्यासाठी पायऱ्यांची सोय होती.त्याचबरोबर ध्यानमंदीर व्याख्यान आणि इतर उपक्रमांसाठी खोल्या होत्या.या सर्वामुळे तेथील वैभवात भर पडली होती.अशोक, गुप्तराजे आणि हर्षवर्धन हे या ठिकाणाचे नावाजलेले आश्रयदाते होते.अपघाताने लागलेल्या अग्निमुळे येथील मूळग्रंथाचा नाश झाला आहे. बख्तियार खिलजी याच्या वैचारिक हल्यामुळे नालंदा विद्यापीठाचे वैभव नष्ट झाले.

 

 आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे साठी येथे स्पर्श करा.. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा