इयत्ता - आठवी
विषय - समाज विज्ञान
माध्यम - मराठी
अभ्यासक्रम - २०२२ सुधारित
विषय - स्वाध्याय
प्रकरण – 9
दक्षिण भारतातील राजघराणी - सातवाहन,कदंब,गंग
I. खालील
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. सिमुखाने श्रिककुलम ही आपली राजधानी
केली.
2. हलाने गाथासप्तशती हा ग्रंथ लिहिला.
3. कन्नड भाषेतील पहिला शिलालेख हल्मिडी होय.
4. कदंबाची राजधानी ही आताच्या उत्तर कन्नड या जिल्ह्यात आहे.
5. गंग घराण्यातील दुर्विणीत हा मुख्य राजा होय.
6. चौंडरायाने लिहिलेला ग्रंथ चौडपुराण
हा होय.
7. सातवाहन घराण्यातील शेवटचा राजा कोण ? त्यांचा शेवट कसा झाला ?
उत्तर - सातवाहन घराण्यातील शेवटचा राजा गौतमीपुत्र सातकर्णी होय.शकशस्त्रपुराच्या सततच्या आक्रमणांना तोंड द्यावे लागले.त्यामुळे यांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाला.
8. सातवाहन काळातील कलेबद्दल थोडक्यात माहिती लिहा ?
उत्तर - अजंठा आणि अमरावती मधील चित्रकला सातवाहनांच्या काळात सुरू झाली.राजवाडे देवळे,विहार, चैत्यालय आणि किल्ले बांधले गेले.बनवासीचा व्यापारी भूतपलाने कार्ले येथे चैत्यगृह बांधले आहे.
9. गंगाच्या कारकीर्दीत कोणत्या सामाजिक मूल्याना महत्व होते?
उत्तर - या काळात समाज वेगवेगळ्या जाती-जमातीत विभागला गेला असला तरी परस्परांवर अवलंबून होता.पितृप्रधान एकत्र कुटुंब सर्वमान्य होते.प्रामाणिकता,एकनिष्ठता शौर्य धैर्य ही सामाजिक मूल्ये होती.
10. गंगाच्या काळातील चार ग्रंथांची नावे लिहा.
उत्तर - गंगांच्या कालावधीतील पुस्तके -
दुर्वीणीत - शब्दावतार
गुणाढ्य - वोड्डकथा
श्री पुरुष - गजशास्त्र
शिवमाधव - गजाष्टक
हेमसेन - राघव पांडवीय
नेमचंद्र - द्रव्यसार संग्रह
चौंडराय - चौडपुराण
आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे साठी येथे स्पर्श करा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा