/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

NAVAVI MARATHI 5.AKHANDA (5.अखंड)

   

5.अखंड

             कवी -  महात्मा जोतीराव फुले
परिचय :
Fपूर्ण नाव - जोतीराव गोविंदराव फुले

Fमहात्मा फुले या नावाने प्रसिद्ध.

Fजन्म ११ एप्रिल १८२७

Fजन्म ठिकाण कटगुण जिल्हा- सातारा

Fएकोणिसाव्या शतकातील थोर कर्ते समाजसुधारक, समतेवर आधारलेल्या समाजाची संकल्पना मांडणारे विचारवंत होत.शिक्षणाचा प्रवाह समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अपार कष्ट घेतले.

Fसत्यशोधक समाजाची स्थापना केली.

F'ब्राह्मणाचे कसब', 'गुलामगिरी', 'शेतकऱ्याचा असूड', 'इशारा', 'सार्वजनिक सत्यधर्म', 'तृतीय रत्न' इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

Fसंतांनी ज्या प्रमाणे 'अभंग' ही काव्यरचना केली त्याप्रमाणेच महात्मा जोतीराव फुले यांनी स्वतः च्या काव्यरचनेला 'अखंड' हे नाव दिले आहे.

Fमानवी आचार विचारामध्ये सत्य, ज्ञान, सद्विवेकबुद्धी व मानवता असणे हाच मानवाचा धर्म आहे. असे प्रतिपादन खालील 'अखंडा'तून व्यक्त झाले आहे.
                          (मूल्य : मानवता, परोपकार)

स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) महात्मा जोतीबा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली.
(अ) प्रार्थना समाज
(
ब) ब्राह्मो समाज
(
क) सत्यशोधक समाज
(
ड) आर्य समाज
उत्तर -  (क) सत्यशोधक समाज
(
आ) महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म किती साली झाला ?
(अ) 1927
(
ब) 1827
(
क) 1826
(
ड) 1829
उत्तर - (ब) 1827
(
इ) महात्मा फुले यांनी काव्य रचनेला कोणते नाव दिले आहे ?
(अ) अभंग
(
ब) ओवी
(
क) अखंड
(
ड) श्लोक
उत्तर -  (क) अखंड

 

प्र. 2 (रा) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(अ) मानवी चित्तास स्वस्थता केव्हा लाभते ?
उत्तर - जेव्हा सत्याचा जिव्हाळा व मनाची स्वच्छता असते तेव्हा मानवी चित्तास स्वस्थता लाभते.
(
आ) यशवंत होण्यासाठी कोणत्या गुणाची गरज आहे?
उत्तर - यशवंत होण्यासाठी संयम,धीर या गुणांची गरज आहे.
(
आ) मानवाचा कोणता धर्म आहे?
उत्तर - सत्य हा मानवाचा धर्म आहे.
(
ई) ज्ञानी माणूस कोणाला म्हटले आहे?
उत्तर - जो दुसऱ्याचे भले व्हावे व सर्वजण सुखी व्हावे असा विचार करतो अशा व्यक्तीला ज्ञानी माणूस म्हणतात.

 
प्र. 3 ( रा ) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(
अ) धीर धरूनीयां सर्वां सुख देती।। यशवंत होती ।। जोती म्हणे ।।
संदर्भ - वरील ओळी महात्मा फुले यांच्या 'अखंड' या काव्यरचनेतील आहेत.

स्पष्टीकरण - मानवी विचारात स्वस्थता असावी.एकमेकास धीर देत सहकार्य असावे.सर्वांना सुख देतो. तोच यशवंत होतो असे वरील ओळीतून जोतिबा म्हणत आहेत.
(
आ) मानवाचा धर्म सत्य हीच नीती
बाकीची कुनीती ।। जोती म्हणे ।।
संदर्भ - वरील ओळी महात्मा फुले यांच्या 'अखंड' या काव्यरचनेतील आहेत.

स्पष्टीकरण - सत्य हाच मानवाचा खरा धर्म आहे या धर्माचे आचरण केल्यास मानवाच्या जीवनात आराम मिळतो सुख मिळते असे वरील ओळीतून जोतिबा सांगत आहेत.
(
इ) आपसुखदुःख पराचें जाणतो ।। त्यांच्याशी वततो ।। तोच धन्य ।।
संदर्भ - वरील ओळी महात्मा फुले यांच्या 'अखंड' या काव्यरचनेतील आहेत.

स्पष्टीकरण - जो दुसऱ्यांचे सुख दुख जाणतो व त्यांच्याशी सदगुणाने वागतो. तूच खरा धन्यवाद असे सांगण्यासाठी ज्योतिबांनी वरील ओळी सांगितल्या आहेत.

 

प्र.4 (था) खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत उत्तरे लिहा.
(अ) मानवाला यशवंत होण्यासाठी कोण कोणत्या सद्गुणांची आवश्यकता आहे?
उत्तर - सत्य बोलणे सदविवेक बुद्धी असणे.दुसऱ्याच्या सुखदुःखात सामील होणे.दुसऱ्याचे दु:ख ते आपलेच दुःख म्हणून सर्वजण सुखी व्हावे अशी आशा बाळगणे.मानवता हाच खरा धर्म मानणे व प्रामाणिकपणा असणे.या सदगुणांची मानवाला यशवंत होण्यासाठी गरज आहे.
(
आ) महात्मा फुले यांनी कोणत्या मानवाला सद्गुणी म्हटले आहे?
उत्तर - जो सत्याच्या मार्गाचा अवलंब करतो.सत्य हीच नीती आहे असे म्हणतो.ज्याचे मन स्वच्छ व निर्मळ आहे.जो दुसऱ्यांना धीर देतो.सर्व काही सहन करतो.दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होऊन परोपकार करतो.अशा व्यक्तीला महात्मा फुलेंनी सद्गुनी म्हटले आहे.

प्र.5 (वा) खालील प्रश्नाचे आठ ते दहा ओळीत उत्तर लिहा.

(अ) महात्मा फुले यांनी सत्याचे स्वरूप कसे स्पष्ट केले आहे?
उत्तर - मानवी आचार विचारामध्ये सत्य, ज्ञान, सद्विवेकबुद्धी व मानवता असणे हाच मानवाचा आहे.असे प्रतिपादन खालील 'अखंडा'तून व्यक्त झाले आहे.सत्यवर्तन करण्यातच आपले आयुष्य खर्ची घालावे.सत्य हाच मानवाचा खरा धर्म आहे.सत्य नसेल तेथे मतभिन्नता निर्माण होते.सत्याने वागणे हाच खरा सदाचार आहे. सत्याचे आचरण करणे हाच मानवाचा धर्म आहे.सत्य सोडून बाकीचे वागणे म्हणजे दुराचार आहे.जे सत्य आहे ते खरे आहे अशी भावना बाळगली पाहिजे.सत्याने वागणाऱ्याच्या मनामध्ये कोणताही लोभ व लालसा नसावी.सत्यामुळे माणसाला सर्व सुखसमाधान मिळते. सत्यामुळेच माणूस सद्गुणी बनतो.
भाषाभ्यास :
(
अ) विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
सत्य × असत्य
दुःख × सुख
ज्ञानी × अज्ञानी
स्वच्छता × अस्वच्छता
आशा × निराशा
धर्म × अधर्म
सद्गुण × दुर्गुण

 

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये

👇👇👇👇👇👇👇👇👇

 

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा