गद्य ६. ओळख
लेखिका - शांता शेळके
परिचय :
पूर्ण नाव - शांता जनार्दन शेळके
यांनी (1921-2002)
त्या प्रसिद्ध कवयित्री म्हणून परिचित आहेत. कथा, कादंबरी, बालसाहित्य
इत्यादी वाङ्मय प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले आहे.
F कथासंग्रह -'अनोळख', 'गोंदण', 'तोच
चंद्रमा',
'वर्षा' इत्यादी काव्यसंग्रह. ‘अनुबंध', 'काचकमळ', 'कावेरी', 'मुक्ता' इत्यादी
कथासंग्रह.
Fकादंबरी लेखन - 'ओढ', 'पुनर्जन्म', 'भीषण छाया', 'मायेचा
पाझर'
इत्यादी कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे.
( मूल्य - बालमनाची निरागसता )
शब्दार्थ :
■ वीकएंड- आठवड्याचा शेवट
■डोळ्यात तरळणे - नजरेत येणे
■कटवले जाणे - दूर करणे
■दखल घेणे- लक्ष देणे
■ स्विमिंग पूल - पोहण्याचा तलाव
■नॅपकिन्स - लहान रूमाल
■डिशेस-लहान ताट -
■ मैफल - संगीत सभा
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) लेखिका शांता शेळके या विषयाच्या प्राध्यापिका होत्या.
(अ) हिंदी
(ब) इंग्रजी
(क) मराठी
(ड) इतिहास
उत्तर - (क) मराठी
(आ)
'कावेरी' या पुस्तकाचा
वाङ्मयप्रकार हा आहे..
(अ) कथासंग्रह
(ब) काव्यसंग्रह
(क) कादंबरी
(ड) नाटक
उत्तर – (अ)
कथासंग्रह
(इ)मंडळी यावर
खुर्च्या टाकून बसली होती.
(अ) सतरंजी
(ब)लॉन
(क) घोंगडी
(ड) गादी
उत्तर – (ब)लॉन
(ई) छोटीचा एक
चिमुकला स्विमिंग पूल याचा होता.
(अ) सिमेंटचा
(ब) रबराचा
(क) प्लास्टिकचा
(ड) मातीचा
उत्तर – (क)
प्लास्टिकचा
(उ) यजमानांचा
व्यवसाय हा होता.
(अ) वकिली
(ब) शिक्षक
(क) डॉक्टर
(ड) उद्योगपती
उत्तर – (क) डॉक्टर
(ऊ) माणसे घरोघर
निघून गेली, तरी
छोटीचे हे चालूच होते.
(अ) हुंदके देणे
(ब) खेळणे
(क) वाचने
(ड) बोलणे
उत्तर – (अ) हुंदके
देणे
प्र. 2 खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(अ) लेखिका शांता
शेळके यांचे पूर्ण नांव काय ?
उत्तर - लेखिका शांता शेळके यांचे पूर्ण नाव शांता
जनार्दन शेळके हे होय.
(आ)
'ओळख' हा ललित लेख
कोणत्या मूळ पुस्तकातून निवडलेला आहे?
उत्तर - 'ओळख' हा ललित लेख
'पावसा आधीचा पाऊस' या मूळ पुस्तकातून निवडला आहे.
(इ)
यजमानांची छोटी जेमतेम किती वर्षांची होती ?
उत्तर - यजमानांची छोटी जेमतेम पाच- सहा वर्षांची होती
(ई)
छोटी आत धावत जाऊन काय घेवून आली ?
उत्तर - छोटी आत धावत जाऊन पत्त्यांचा छोटा जोड घेऊन आली.
( उ
) छोटी पुन: पुन्हा कोणते प्रश्न विचारीत होती ?
उत्तर - छोटी,एवढा वारा येतो कसा? इतका पाऊस पडतोच कसा?असे प्रश्न पुन: पुन्हा विचारत होती
प्र. 3 (रा) खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) यजमानांच्या
घराची रचना कशी होती ?
उत्तर - यजमानांचे घर सुंदर होते.पुढल्या बाजूला चिमुकली बाग,मागे हिरवेगार लॉन होते.त्यापलीकडून एक हायवे जात
होता.घरातून सरळ पाहिले तर नजर थेट निळ्याभोर क्षितिजाला जाऊन भिड.अशी यजमानांच्या
घरची रचना होती.
(आ)
छोटी काही वेळ बाजूच्या खुर्चीवर का जाऊन बसे ?
उत्तर - जेव्हा सर्व मंडळींच्या गप्पा चालत.तेव्हा छोटीलाही तिथे
जावे असे वाटे. मग ती हळूहळू त्यांच्या जवळ जाई. पण ती तिथे गेल्यावर तिच्याकडे
कोणी हसून बघत असत व पदार्थाचा तुकडा देऊन बाजूला करत असे.म्हणून छोटी बाजूस
खुर्चीवर जाऊन बसे.
(इ)
यजमानांच्या घरी मैफल कशी रंगत असे ?
उत्तर - यजमानच्या घरात मित्रमंडळींच्या गप्पा सुरू होत. तेव्हा
यजमान त्यांच्या करमणुकीसाठी टेप लावत असत. मैफिलीतील माणसे पदार्थ खात गाणी ऐकत
असत. गाण्यावर दात देत असत.'वाहवा !' 'क्या बात है' 'मार्व्हलस' अशी
दाद देऊन मैफल रंगत असे.
उत्तर - अचानक आलेला विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्याचा झोत वेगाने आत शिरला.त्यामुळे बाहेर असलेला छोटीचा स्विमिंग पूल वाऱ्याच्या झोतात उडून गेला असे तिला वाटले त्यामुळे एका क्षणात स्थिर असलेले अस्थिर झाले हे तिने प्रथमच पाहिले होते.म्हणून छोटी मुळापासून हादरून गेली.
प्र.4 (था) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(अ) 'वाहवा !' 'क्या बात है' 'मार्व्हलस'.
संदर्भ - वरील ओळ शांता शेळके लिखित ओळख या पाठातील आहे.
स्पष्टीकरण - यजमानच्या घरी जमलेली माणसे खाद्यपदार्थ खात गाणी ऐकत होती.त्यावेळी गाण्यांच्या नेमक्या जागांना दाद देत होती.तेव्हा वरील वाक्य म्हटले आहे.
(आ) 'माझा स्विमिंग पूल', 'माझा स्विमिंग पूल'
संदर्भ - वरील ओळ शांता शेळके लिखित ओळख या पाठातील आहे.
स्पष्टीकरण - अचानक आलेल्या वादळात छोटीचा स्विमिंग पूल उडून गेला असे तिला वाटले.छोटीने असे वादळ प्रथमच पाहिले होते.त्यामुळे ती खूप घाबरली व मोठ्याने रडत होती.तेव्हा वरील वाक्य म्हटले आहे.
(अ) छोटीचे लाड सगळेजण कसे करत होते?
उत्तर -छोटी चुणचुणीत गोड असल्याने जमलेले अंकल आंटी आपल्या गप्पा टप्पात रंगली असली तरी ती जेव्हा एखाद्याच्या मांडीवर जाऊन बसे किंवा मग मागे जाऊन गळ्यात हात टाके तेव्हा तिची कौतुकाने दखल घेतली जाई.एखादी वाक्य तिच्याशी बोलत.खाद्यपदार्थाचा तुकडा तिच्या तोंडी देत.कोणी तिचा मुक्का घेत असत.तर कोणी गुबरे कुरवाळत होते.असे सर्वजण छोटीचे लाड करत होते.
(आ) यजमानांनी पाहुण्यांची जेवणाची सोय कशी केली होती?
उत्तर - यजमानांनी पाहुण्यांची जेवणाची सोय उत्तम प्रकारे केली होती.टेबलावर विविध खाद्यपदार्थ मांडले होते.पक्वानांना रुचकर दरवळ सुटला होता हातात विशेष नॅपकिन्स घेऊन मंडळी टेबलाभोवती गोळा झाली. आपणाला हवे ते पदार्थ बश्यातून घेऊ लागली.मग दिवाणखान्यात सोयीस्कर जागा बघून कोणी कोचावर आसन ठेवले तर कोणी जमिनीवरच बैठक मारली.अशी पाहुण्यांची जेवणाची सोय केली होती.
(इ) छोटी संकटांना धीराने तोंड देईल असे आईला का वाटते?
उत्तर - कारण छोटीने जे वादळ पाहिले होते.त्या वादळाचा ठसा तिच्या अबोध मनावर कुठेतरी राहिल.तो जन्मभर तिचा पाठपुरावा करील.एका रात्रीतच ती खूप वाढलेली असेल ती अधिक शहाणी झालेली असेल म्हणून येणाऱ्या संकटांना ती धीराने तोंड देईल अशी छोटीच्या आईला वाटते.
प्र. 6 (वा) खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा.
(अ) यजमानांच्या घरी सुंदर सहज वातावरण केव्हा व कसे तयार झाले होते?
उत्तर - यजमानांचे घर सुरेख होते.वीकेंडच्या शनिवारी मित्रमंडळी त्यांच्या घरी एकत्र जमली होती.मावळत्या सोनेरी किरणात लॉनचा हिरवा रंग वेगळी छटा घेऊन चमकत होता.मंडळी लॉनवर खुर्च्या टाकून बसली होती.पुढ्यात पेये,खाद्यपदार्थ होते.गप्पांना रंग चढला होता.सर्वजण आपल्या मायबोलीत मराठीत बोलत होती.अनेक वर्षांच्या ओळखीमुळे अकृत्रिम मोकळेपणा होता.एकमेकांना एकेरी नावाने संबोधत होते. घरगुती चौकशी चालल्या होत्या.हास्य विनोदात एक सहज सुंदर वातावरण तयार झाले होते.
(आ) अचानक आलेल्या 'वादळ, पावसाचे वर्णन करा. e
उत्तर - बाहेर विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि वादळी वाऱ्याचा झोत वेगाने आत शिरला.दारे,खिडक्या धाडधड उघडून वारे आत शिरले.अचानक सुरू झालेले वादळ पाहून माणसेही दचकली होती.मध्ये कोणताच अडथळा नसल्याने वादळ क्षितिजापासून विनाअटक घरात घुसले होते ते वेट लागल्यासारखे घुमत होते.
(अ) वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
लगट करणे - मैत्री करणे
मी पुस्तकांशी लगट केली.
छातीशी घट्ट धरणे - सांत्वन करणे.
छोटीच्या आईने छोटीला आपल्या छातीशी घट्ट धरले.
मुळापासून हादरून जाणे - खूप घाबरणे
छोटी मुळापासून हादरून गेली होती.
कटवले जाणे - बाजूला सारणे
सर्वांनी छोटीला कटवले.
आसन ठोकणे- आरामात बसणे
मी बाहेर कोचवर आसन ठोकले.
(आ) समानार्थी शब्द लिहा.
सूर्य - भास्कर,मित्र,रवी
वारा- पवन,अनिल,वायू
पाऊस - जलधारा
आई - माता, जननी
चिंता - काळजी
रात्र - रजनी,निशा
c
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये
👇👇👇👇👇👇👇👇👇
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा
💠💠🏆🏆💠💠💠🏆
इयत्ता - नववी
मराठी प्रश्नोत्तरे
Click the below link
✡️e Samved
व्हिडिओ✡️
Click the below link
https://www.smartguruji.in/2021/07/blog-post_16.html
मराठी व्याकरण सराव टेस्ट
Click the below link
MARATHI VYAKARAN SARAV TEST (मराठी व्याकरण सराव टेस्ट) - www.smartguruji.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा