इयत्ता - सातवी
विषय - समाज विज्ञान
माध्यम - मराठी
अभ्यासक्रम - २०२२ सुधारित
विषय - स्वाध्याय
पाठ – 6
म्हैसूर व इतर प्रांत
1. म्हैसूरु वडेयरांची
राजधानी कोणती ?
उत्तर - श्रीरंगपट्टण ही म्हैसूरुच्या वडेयरांची राजधानी होती.
2. म्हैसूरु
राज्यात टपाल व्यवस्था सुरू करणारा राजा कोण ?
उत्तर - चिक्कदेवराज वडेयर यांनी म्हैसूरु राज्यात टपाल व्यवस्था सुरू
केली.
3. चिक्कदेवराय
वडेयरांच्या लोकोपयोगी सुधारणा कोणत्या ?
उत्तर - चिक्कदेवराज वडेयरनी अनेक लोकोपयोगी कार्ये केले.लोकांची
फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी वजन आणि मापे यांचे नियम केले.प्रशासनातील
भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी त्यांनी पावले उचलली.राजधानीमध्ये राज्यकारभारासाठी 18 शाखांची स्थापना केली.
4. हैदर
अलीनी केलेली कार्ये कोणती ?
उत्तर - हैदरा अलीने आपल्या समकालीन राजकीयांना चांगले समजून घेतले
होते.त्याला लिहिता वाचता येत नव्हते तरीही त्याला कन्नडसहित काही भाषा अवगत
होत्या.त्याने महसूल राज्याचा विस्तार केला.शूर योद्धा व दक्ष राजकारणी असलेल्या
हैदरा अलीला कर्नाटकाच्या इतिहासात प्रमुख स्थान आहे.बेंगळुरूमधील लालबागेची
सुरुवात यांच्यापासून झाली.
5. दरिया
दौलत कोठे आहे ?
उत्तर - दरिया दौलत श्रीरंगपट्टण येथे आहे.
6. तिसऱ्या
म्हैसूरु युद्धाचे परिणाम कोणते?
उत्तर - तिसऱ्या म्हैसूरु युद्धात ब्रिटिशांनी टिपूवर आक्रमण
केले.राजधानी श्रीरंगपट्टणला वेडा घातला.टिपूकडे दुसरा कोणताच मार्ग न उरल्यामुळे
ब्रिटिशांसमोर श्रीरंगपट्टण येथे शांती करार केला.या शांती करारानुसार त्याचे
अर्धे राज्य ब्रिटिशांना दिले.युद्धाचे परिहार धन म्हणून 330 लाख रुपये दिले.तसेच दोन्ही मुलांना त्यांच्याकडे ओलीस
ठेवले.
7. टिपूच्या
मृत्युनंतर त्याचे सिंहासन कोणी मिळविले?
उत्तर - टिपूच्या मृत्यूनंतर म्हैसूरच्या सिंहासनावर मुम्मडी
कृष्णराज वडेयर यांनी सिंहासन मिळवले.
8. टिपू
सुलतानाने केलेली कार्ये कोणती?
उत्तर - टिपूने राज्याच्या समृद्धीसाठी फार प्रयत्न केले.
👉टिपूने
रेशमी व्यवसाय राज्यात लोकप्रिय केला.
👉कागद तयार करण्याचा कारखाना हरिहरमध्ये स्थापन केला.
👉फ्रेंच अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपले सैन्य अत्याधुनिक
शस्त्रास्त्रानी असल्याने सज्ज केले.
👉श्रीरंगपट्टण येथे मिश्र धातूंचा कारखाना सुरू केला.
👉रॉकेट वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित केले.
👉टिपूने शेतकऱ्यांना अनुकूल कर आकारणी केली. शेतीसाठी कर्ज
उपलब्ध करून दिले.
9. मोठे
वेंकटप्पा नायकाची कामगिरी कोणती?
उत्तर - वेंकटप्पा नायक केळदी राज्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध
होता.त्याच्या काळात केळदी संपूर्ण स्वतंत्र झाले.त्यांनी किनारपट्टीवरील
चंद्रगिरी नदीपर्यंत विजय संपादन केला. उल्लाळची राणी अब्बक्काच्या मदतीने
मंगळूरमध्ये पोर्तुगीजांचा पराभव केला.विजापूरच्या आदिलशाहीच्या सैन्याचा पराभव
करून हानगल येथे विजयस्तंभ उभारला. त्याने सर्व धर्मांना प्रोत्साहन दिले.
10. केळदीच्या
इतिहासामध्ये 'पश्चिम
समुद्राचा राजा' असे
कोणाला म्हणतात?
उत्तर - शिवाप्पा नायक यांना केळदीच्या इतिहासामध्ये 'पश्चिम समुद्राचा राजा' असे म्हणतात.
11. गोव्याच्या
ख्रिस्तांना शिवाप्पा नायकाने कसे प्रोत्साहित केले?
उत्तर - गोव्याचे ख्रिस्ती शेतीमध्ये निपुण होते.त्यांना आपल्या
राज्यात स्थलांतरित होण्यास जमीन,पैसे देऊन
शिवाप्पा नायकांनी प्रोत्साहन दिले.
12. शिस्त
म्हणजे काय ?
उत्तर - शिवाप्पा नायकाने लागू केलेल्या महसूल व्यवस्थेला शिस्त
असे म्हणतात.
13. राणी
चन्नम्मा कोण होत्या?
उत्तर - राणी चन्नम्मा शिवबा नायकांची सून होत्या.
14. केळदीच्या
नायकांनी केलेली मुख्य कार्ये लिहा.
उत्तर - केळदीच्या नायकांनी केलेली काही महत्त्वाची कार्ये पुढील
प्रमाणे..
1. केळदी राज्यांनी अनेक देवालयांची निर्मिती
केली.
2. केळदी राज यांनी अनेक मठांची तसेच
कारागृहांची स्थापना केली.
3.आपल्या राज्यामध्ये अन्नछत्र आणि
शिक्षणाची केंद्रे निर्माण केली.
4.सर्व धर्मांना भरपूर दान दिले.
5.राणी चन्नम्मानी मंगळुरात चर्चसाठी जमीन
दिली.
15. मदकरी नायकावर टिपा लिहा.
उत्तर - मदकरी नायक हा चित्रदुर्गच्या नायकांपैकी अत्यंत प्रबळ आणि
प्रसिद्ध राजा होता.वयाच्या केवळ 12 व्या वर्षी तो सिंहासनावर बसला.मदकरीने बऱ्याच युद्धांमध्ये
हैदर अलीला सहाय्य केले होते.परंतु तरीसुद्धा हैदर अली मदकरी नायकाच्या शौर्याचा
मनातल्या मनात मत्सर करीत असे.त्याने चित्रदुर्गच्या सात पदरी किल्याला वेढा
घातला. पण तो भक्कम किल्ला जिंकणे हैदरला शक्य झाले नाही. त्यामुळे त्याच्या
सैनिकांनी किल्ल्यात प्रवेश करण्याचा गुप्त मार्गाचा शोध लावला. पहारेकरी नसताना
त्या मार्गाने किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पहारेकऱ्याची
पत्नी ओबव्वाने बाजूला असलेल्या मुसळाने अनेक शत्रु सैनिकांना ठार करून चित्रदुर्ग
किल्ला अजिंक्य ठेवला.
16. ओणके
ओबव्वा यांची आजही आपण का आठवण काढतो?
उत्तर - कारण ओणके ओबव्वा या एक स्त्री असताना आपल्या पतीच्या
गैरहजरीत हैदर अलीच्या सैनिकानी अचानक चित्रदुर्ग किल्ल्यावर हल्ला केल्यानंतर चित्रदुर्ग
किल्ला वाचविण्यासाठी मुसळाने शत्रूसैनिकांना ठार केले व चित्रदुर्ग किल्ला
अजिंक्य ठेवला.म्हणून आजही ओणके ओबव्वा यांची आपणास आठवण येते.
उत्तर - पहिल्या केंपेगौडानी बेंगळुरू शहराची स्थापना सा.श. 1537 साली केली.त्यांनी बेंगळुरात किल्ला बांधून तेथून राज्यकारभार केला.बेंगळुरातील बसवनगुडी येथील बसव देवालय,हलसुरातील सोमेश्वर देवालय यांची निर्मिती केली.बेंगळूरूमध्ये अनेक तळी निर्माण करण्याचा मान पहिल्या केंपेगौडाना जातो.त्यापैकी केंपाबुधी तळे,धर्मांबुधी तळे, हलसूरू तळे तसेच संपंगी तळे ही काही होत.शिवगंगा गंगाधरेश्वराचा परमभक्त असलेल्या पहिला कॅम्पेगवडाने घरे तसेच आग्रहांची निर्मिती केली.धर्मप्रभू असलेल्या केंपेगौडाला 'प्रजावत्सल'अशी बिरुदावली होती.
18. दुसऱ्या केंपेगौडाबद्दल टिपा लिहा.
उत्तर - दुसरा केंपेगौडा हा पहिल्या केंपेगौडाचा मुलगा होय. केंपेगौडा घराण्यातील राजांनी मागडीला आपली राजधानी बनविली व राज्य कारभार चालविला.म्हणून या राज्यकर्त्यांना मागडी केंपेगौडा म्हणतात.दुसऱ्या केंपेगौडाने बेंगळूरु येथे सीमा ओळखण्यासाठी चार गोपूरे बांधली. त्यांच्या कारकिर्दीत बेंगळूरु हे विणकामाचे मोठे केंद्र म्हणून विकसित होऊ लागले.त्यांनी नवीन गावे आणि मंदिरे तसेच तळी बांधून नावलौकिक मिळविला.
19. कावेरी नदीच्या उगमस्थानाला काय म्हणतात ?
उत्तर - कावेरी नदीच्या उगमस्थानाला तलकावेरी म्हणतात.
20. कोडगू राज्यावर राज्य केलेले मुख्य राजघराणे कोणते ?
उत्तर - हालेरी राजघराणे हे कोडगू राज्यावर राज्य केलेले मुख्य राजघराणे होय.
21. अमरसुळ्याचे बंड का झाले?
उत्तर - कॅनरा जिल्ह्यात शेतकऱ्यांवर शेतीचा कर लावल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड केले.
22. कित्तूरची राणी चन्नम्मा इंग्रजा विरुद्ध का लढल्या ?
उत्तर - धारवाडचा कलेक्टर थॅकरे यांनी दत्तक पुत्र घेणे हे नियमानुसार नाही अशी कुटुनीती अवलंबिली.कित्तूरचा कारभार ब्रिटिश सरकारकडे सोपवावा अशी शिफारस केली.या पत्रामुळे राणी रागावल्या व त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढाई केली.
23. संगोळी रायण्णा कोण होते? त्यांचा शेवट कसा झाला?
उत्तर - संगोळी रायण्णा हे राणी चन्नमांचे निष्ठावंत सरदार होते.
धनाच्या लोभाने देशद्रोहीनी रायण्णाला पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. अंतिम भेटीसाठी आलेल्याआई केंचव्वाना साष्टांग दंडवत घातला आणि हसत हसत फासावर गेले.
24. तुळुनाडूमध्ये सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राजघराण्याचे नाव सांगा.
उत्तर - अळुप या राजघराण्याने तुळुनाडूमध्ये सर्वात जास्त काळ राज्य केले.
उत्तर - अब्बक्का ही उल्लाळची राणी होती.
26. फर्डिनंड कीटेल कोण होते ?
उत्तर - फर्डिनंड कीटेल हे बासेल मिशन चे धर्मगुरू व कन्नड भाषेचे अभ्यासक होते.
27. हजार स्तंभ असलेली बस्ती कोठे आहे ?
उत्तर - मुडबिदरी येथे हजार स्तंभ असलेली बस्ती आहे.
28. तुळुनाडूच्या प्रसिद्ध प्राचीन कला कोणत्या ?
उत्तर - यक्षगान आणि झांज वाजविणे या तुळुनाडूच्या प्रसिद्ध प्राचीन कला होत्या.
29. कार्नाडू सदाशिवराव यांना आम्ही का आठवण करावे ?
उत्तर - कारण देशभक्त कार्नाडू सदाशिवराव यानी हरिजनांची सेवा केली.दलितांच्या काही मुलांना त्यांनी आपल्या घरात भोजन घातले.देशासाठी सर्वस्व त्याग करून आदर्श निर्माण केला. म्हणून कार्नाडू सदाशिवराव यांना आपण विसरू शकत नाही.
30. कुदमल रंगराव यांनी दलितांच्या उद्धारासाठी कोणते कार्य हाती घेतले?
उत्तर - अस्पृश्यतेविरुद्ध चळवळी, दलित मुलींचे शिक्षण, अशी अनेक दलितांच्या उद्धाराची कार्ये कुदमल रंगराव यांनी हाती घेतली होती.
31. तुळुनाडूमध्ये स्थापन केलेल्या भारतीय प्रमुख बँका कोणत्या ?
उत्तर - कॅनरा,कार्पोरेशन,सिंडिकेट,कर्नाटक आणि विजया बँक या तुळुनाडूमध्ये स्थापन केलेल्या भारतीय प्रमुख बँका होत्या.
उत्तर - स्थानिक जमीनदारांकडून होणारे शोषण आणि ब्रिटिशांनी लागू केलेला शस्त्रास्त्र कायदा, वन कायदा आणि ब्रिटिशांची दडपशाही ही बेडनायकांच्या बंडाची मुख्य कारणे होती.
33. हलगलीच्या बेडनायकांनी कोणत्या कायदयाचा विरोध केला?
उत्तर - हलगलीच्या बेडनायकांनी ब्रिटिशांच्या शस्त्रास्त्र कायद्याचा विरोध केला.
34. रामी कोण होती ?
उत्तर - रामी ही हलगली उठावामध्ये ब्रिटिशांच्या तीन सैनिकांना गोळ्या घालून ठार करणारी वीर महिला होती.
35. सिंधूर लक्ष्मण कोण होते ?
उत्तर - सिंधूर लक्ष्मण हे ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करणारे महावीर होते.
36. 1857-58 च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात सुरपूरच्या वेंकटप्पा नायकांचे पात्र कोणते?
उत्तर - वेंकटप्पा नायकांनी 1857 च्या सुरपुर येथे 1857-58 च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला. ब्रिटिशांच्या सैन्याने सूरपुर किल्ल्याला वेढा घातल्यावर भयंकर संघर्ष झाला. शेवटी ब्रिटिशांनी कपटाने किल्ल्याच्या गुप्त मार्गाची माहिती घेतली व सुरपुरवर विजय मिळविला.
पण ब्रिटीश सैन्याला फसवून वेंकटप्पा नायक हैद्राबादच्या निजामाकडे मदतीसाठी गेले पण निजामाने लोभापोटी त्यांना ब्रिटिशांकडे सोपविले.ब्रिटिशांना त्यांना फसवून गोळी घालून ठार केले.
37. कालागप्ती म्हणजे काय ?
उत्तर - कालागप्ती म्हणजे निजामानी लागू केलेले 53 जाचक नियम होय.
38. स्वामी रमानंद तीर्थ कोण होते ?
उत्तर - स्वामी रमानंद तीर्थ हे ब्रिटीश व निजाम विरुद्ध संघर्ष करणारे जनप्रिय नायक होते.
39. 'कर्नाटकाचे गांधी' असे कोणाला म्हणतात?
उत्तर - हर्डीकर मंजप्पा यांना 'कर्नाटकाचे गांधी' असे म्हणतात.
40. वंदे मातरम् आंदोलनाचे नेते कोण होते ?
उत्तर - वीर नायक रामचंद्रराव हे वंदे मातरम् आंदोलनाचे नेते होते.
उत्तर- हैदराबाद मुक्तता संघर्षात भूमिगत राहून कार्य करणारा व संघटना निर्माण करणारा तरुण नेता म्हणजे शरणगौडा इनामदार होय.त्यांनी रजाकारावर हातगोळयानी हल्ला केला.त्यामुळे अनेक खेडी राजाकारांच्या अत्याचारातून मुक्त झाली.त्यामुळे लोक त्यांना सरदार या नावाने ओळखू लागले.रजाकारावरील हल्ल्यामुळे घाबरून लाखो लोक हैदराबाद संस्थान सोडून स्वतंत्र भारतात स्थलांतरित झाले.हजारो तरुणांनी हैदराबादच्या सीमाभागात शिबिरांची स्थापना करून रजाकार लुटारूंच्या टोळ्या विरुद्ध सशस्त्र संघर्ष केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा