इयत्ता - सातवी
विषय - समाज विज्ञान
माध्यम - मराठी
अभ्यासक्रम - २०२4 सुधारित
विषय - स्वाध्याय
पाठ ९ – राज्य सरकार
1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. शिक्षक प्रतिनिधी विधान परिषद सदनाचे सदस्य असतात.
2. सुवर्णसौध बेळगावी शहरात आहे.
3. विधानसभेचे कामकाज सभापती यांच्या नेतृत्वाखाली चालते
4. राज्यपाल यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
5. कर्नाटक विधानसभा सदस्यांची संख्या 224 इतकी आहे
2. लोक
प्रतिनिधी असलेल्या शासकांगाचा विभाग कोणता?
उत्तर - विधानसभा हा लोक प्रतिनिधी असलेल्या शासकांगाचा विभाग आहे.
4. मुख्यमंत्र्याचे प्रमुख अधिकार आणि कर्तव्ये कोणती ?
उत्तर - मुख्यमंत्र्याचे प्रमुख अधिकार आणि कर्तव्ये खालील प्रमाणे -
•मंत्र्यांची नेमणूक करतात.
• मंत्र्यांचे खातेवाटप करणे अथवा बदलणे.
• मंत्र्याला पदच्यूत करणे किंवा त्या पदावरुन काढून टाकणे.
• केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंध उत्तम राखणे.
5. विधानसभा सदस्यांची कर्तव्ये कोणती ?
उत्तर - विधानसभा सदस्यांची कर्तव्ये-
👉आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातील समस्या सोडवणे.
👉निवडून आलेल्या पक्षाच्या विविध नियोजनात सहभागी होणे.
👉नवीन कायद्याच्या अंमलबजावणीचे समर्थन करणे अथवा विरोध करणे.
👉मुख्यमंत्र्यांनी सोपवलेल्या खात्याची जबाबदारी पार पाडणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा