7. आर्थिक उपक्रम म्हणजे काय ?
उत्तर - माणसाने पैसा कमावणे आणि पैशाचा वापर करणे याला आर्थिक उपक्रम असे म्हणतात.
8. विद्यार्थी पेन विकत घेतो ही कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे?
उत्तर - उपभोग
III. खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा.
9. मानवाचे आर्थिक उपक्रम कोणते ?
उत्तर - उत्पादन,उपभोग,विनिमय,वितरण हे मानवाचे आर्थिक उपक्रम आहेत.
10. अर्थशास्त्राचा अभ्यास आपण का केला पाहीजे ?
उत्तर - दारिद्र्य बेकारी आर्थिक विषमता यांची कारणे व त्यावर उपाय शोधणे किमतीतील चढ-उताराची कारणे आणि त्यांचे परिणाम समजणे यासाठी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे.
11. कालानुक्रमे अर्थशास्त्राचा अर्थ कसा बदलत गेला?
उत्तर - प्राचीन काळापासून भारतीयांनी मानवाच्या आर्थिक उद्योगांच्या अभ्यासाला महत्त्व दिले आहे.शेती,उद्योग,कर, महसूल आणि इतर आर्थिक बाबी विषयी मनुस्मृतीमध्ये सविस्तर वर्णन आढळते.मौर्य काळातील कौटिल्याने अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिले.या पुस्तकात राजकीय व्यवस्थापन,आर्थिक व्यवस्थापन आणि इतरही आर्थिक बाबी विषयी विस्तार माहिती मिळते. अशाप्रकारे अर्थशास्त्राचा अभ्यास कालानुक्रमे बदलत चालला आहे.
Community conversation 0
Leave a comment