/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

8th SS Textbook Solution Lesson 26.VYAVASAY ARTH ANI MAHATWA (28.व्यवसाय अर्थ आणि महत्व)


 
इयत्ता - आठवी

विषय - समाज विज्ञान (अर्थशास्त्र)

माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - २०२२ सुधारित 

विषय - स्वाध्याय 

पाठ 28 – व्यवसाय अर्थ आणि महत्व 

 

 I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा

1. इंट्रेपॉट व्यापाराचे उत्तम उदाहरण सिंगापूर हे आहे.

2 कुटीरोद्योग हे विशेषत: ग्रामीण भागात केंद्रीत झाले आहे.

3.रसायनाचे उत्पादन हे लघुउद्योग प्रकारच्या उद्योगधंद्यात केले जाते. 

4 धंद्याचा एकमेव उद्देश म्हणजे फक्त नफा मिळविणे.

5. वस्तुचा दर्जा राखण्यासाठी भारतीय मानक या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

II. खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते चार वाक्यात लिहा :

6. फिरत्या दुकानांचे प्रकार सांगा.
उत्तर -

👉फेरीवाले

👉रस्त्यावरील/फुटपाथवरील गाडीवाले

👉बाजारातील विक्रेते

7. घाऊक व्यापारी म्हणजे काय ?
उत्तर - उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी
करून किरकोळ व्यापाऱ्यांना मालाची

विक्री करतात अशा व्यापाऱ्यांना घाऊक व्यापारी असे म्हणतात.

 

8. विदेशी व्यापाराचे तीन प्रकार सांगा

उत्तर - आयात,निर्यात,इंट्रेपॉट हे विदेशी व्यापाराचे तीन प्रकार आहेत.

9. कुटीरोद्योगातून आणि लघुउद्योगातून उत्पादित केल्या जाणाऱ्या महत्वाच्या वस्तू कोणत्या?

उत्तर - कुटिरोद्योग - सुतारकाम,लोहार काम,चटया, जिमखाना 

लघुद्योग -चप्पल,बूट,सायकल पंखे,रेडिओ 

10. कोणत्या संघटना व्यापारातील जागेची आणि काढण्यास मदत करतात ?

उत्तर - विमा कंपनी 

11. व्यापारात अवाजवी फायदा मिळविण्यासाठी व्यापारी कोणकोणत्या असमाजिक पद्धतीचा अवलंब करतात?

उत्तर - भेसळ,दर वाढ,अवास्तव किंमती, अयोग्य वजन 

12. सरकारने व्यापारातील असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी कोणती पाऊले उचलली आहेत?

उत्तर - भारतीय मानक संस्थेची स्थापना केली आहे.ही संस्था प्रत्येक वस्तूच्या वेष्टनावर

प्रमाण,उत्पादित तारीख, उपभोग,मर्यादा दिनांक,वस्तूचे मूल्य इ. सक्तीने छापावयास लावते.

आवश्यक वस्तू पुरविणारी शिधा वाटप दुकाने आवश्यक वस्तूंचा दर्जा राखण्यासाठी

सरकारने ISI व ॲगमार्कची सक्ती केली आहे.सरकारने जनता बाजार, ग्राहक सहकारी

संस्था इ. सुरू केल्या आहेत.

 
III खालील प्रश्नांची उत्तरे आठ ते वाक्यात लिहा.
13. व्यापाराची आर्थिक उद्दिष्टये कोणती ?
उत्तर -
👉नफा मिळविणे.
👉ग्राहकांच्या गरजा पुरविणे.
👉जाहिरातीच्या माध्यमातून नव्या उत्पादनाविषयी माहिती दिली जाते.
👉व्यवसायातून वस्तू उत्पादित केल्या जातात.
14. व्यापाराची सामाजिक उद्दिष्टये कोणती ?
उत्तर - 
व्यापाराची सामाजिक उद्दिष्टये खालीलप्रमाणे - 

👉लोकांचे राहणीमान सुधारते.

👉सामाजिक कल्याण साधले जाते.

👉उदा. हॉस्पिटल,कॉलेज सार्वजनिक उद्यानांची निर्मिती आणि देखभाल

15. किरकोळ व्यापाऱ्यांकडून कोणत्या सेवा पुरविल्या जातात?

उत्तर - ती ग्राहकांच्या मागणीनुसार मालाचा पुरवठा करतात आणि व्यापारात येणारी

जबाबदारी देखील घेतात. ते मालाचा दर्जा ठरवून ग्राहकांच्या आवडी निवडीनुसार पुरवठा

करतात.

16. किरकोळ व्यापारी कोण?प्रत्येकाबद्दल एक ते दोन वाक्यात माहिती लिहा.

उत्तर - घाऊक व्यापाराकडून मालाची खरेदी करून

ग्राहकाला विकणाऱ्या व्यापाऱ्यांना किरकोळ व्यापारी म्हणतात.

उदा. 

फिरते व्यापारी- यांच्याकडे विक्री करण्यासाठी निश्चित जागा नसते.

उदा.फेरीवाले,गाडीवाले.

फेरीवाले - हे माल डोक्यावरून वाहून नेऊन दारोदारी विक्री करतात.

उदा. भाजीपाला,फळे,फुले विकणारे.

गाडीवाले -: हात गाडीवर माल किंवा वस्तू ठेवून ग्राहकांच्या घरोघरी वस्तू विकतात.

17. उद्योगधंद्याचे दोन प्रकार थोडक्यात स्पष्ट करा.

उत्तर - ही एक आर्थिक प्रक्रिया आहे जी मालाचे उत्पादन खनिजाचे उत्पादन किंवा काही

सेवा पुरवण्याशी निगडित आहेत.

उद्योगधंद्याचे वर्गीकरण मुख्यतः 2 प्रकारात करता येते.

1.प्राथमिक उद्योगधंदे 

2.दुय्यम उद्योगधंदे 

प्राथमिक उद्योगधंदे : या उद्योगामध्ये नैसर्गिक साधनांचा उपयोग करून वस्तूंचे उत्पादन

केले जाते. उदा: शेती, पशुपालन, कुक्कुटपालनखाण उद्योग इ. या, उद्योगधंद्यांचे 'जैविक

उद्योगधंदे व खाण उद्योगाधंदे असे वर्गीकरण करता येते.

दुय्यम उद्योगधंदे : हे उद्योग कामगारांच्या श्रमावर आधारित असून ते दोन विभागात

विभागले आहेत. 1) उत्पादक उद्योगधंदे 2) सहाय्यक उद्योगधंदे (बांधकाम)

 

18. एखाद्या देशाला विदेशी व्यापाराची आवश्यकता का असते?

उत्तर - जगातील कोणताही देश सर्वच बाबतीत स्वावलंबी नाही.काही देश नैसर्गिक साधन

संपत्तीने संपन्न आहेत.या साधनांचा वापर करून ते अनेक वस्तूंची गरजेपुरते आणि

गरजेपेक्षाही जास्त उत्पादन करतात.याप्रमाणे काही देशात नैसर्गिक साधन संपत्तीचा

तुटवडा आहे.त्यामुळे ते त्यांच्या गरजांसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहेत.यामुळे स्वदेशी

व्यापार गरजेचा ठरतो.विदेशी व्यापाराची गरज दिवसेंदिवस वाढतच आहे.यामुळे देशादेशात

मैत्रीचे संबंध निर्माण होण्यास मदत होत आहे.

 आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे साठी येथे स्पर्श करा..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा