इयत्ता - आठवी
विषय - समाज विज्ञान (समाजशास्त्र)
माध्यम - मराठी
अभ्यासक्रम - २०२२ सुधारित
विषय - स्वाध्याय
पाठ 20 – समाजाचे प्रकार
I.रिकाम्या जागा भरा.
1. शिकारी समाजातील लोक कुऱ्हाड,कट्यार,तलवार ही शस्त्रे वापरतात.
2. शेतकरी समाज शेतीच्या मशागतीकरीता जनावरांचा वापर करतात.
3. कार्यकुशलतेवर आधारित असलेल्या कार्यपद्धतीला औद्योगिक श्रम असे म्हणतात.
II. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
4. पशुपालन समाज म्हणजे काय ?
उत्तर - आपल्या गरजा भागविण्याकरिता गुरे चारणे शिकार करणे अन्न गोळा करणे
आणि ठराविक धान्यासाठी शेती हे व्यवसाय तो करतो.
5. शेतकरी समाज म्हणजे काय ?
उत्तर - शेती व्यवसायामध्ये गुंतलेला आणि खूप मोठ्या जमिनीवर मशागत करणारा हा
समाज आहे.
6. कामगार समाज म्हणजे काय ?
उत्तर - कारखान्यात शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने वास्तूची निर्मिती होऊन लागली
या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेला हा समाज कामगार वर्ग होय
7. समाजाचे प्रकार कोणते ?
उत्तर – समाजाचे
प्रकार खालीलप्रमाणे -:
1.शिकार आणि अन्न गोळा करणारा समाज
2.पशुपालन
3.शेती करणारा समाज
4.कामगार समाज
III. खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा.
8. शिकार आणि अन्न गोळा करणाऱ्या जीवन पध्दतीचे वर्णन करा.?
उत्तर - इतर समाजापेक्षा अत्यंत साधा असलेला हा समाज आहे हा समाज लहान कमीत
कमी लोकांचा समावेश असलेला आणि भटके जीवन जगणार आहे ते दगडापासून
बनवलेली कुऱ्हाड तलवार कट्ट्यात इत्यादी शस्त्रे वापरतात स्वतःचा चरितार्थ
चालविण्याकरिता जंगली प्राण्यांची शिकार केली जाते याशिवाय राहणार उपलब्ध अशी
फळे बी बियाणे मुळे कंदमुळे आणि भाजीपाला तो गोळा करतो त्यांनाच पैशाचा मोह
नाही आपापसात वाटून खाणे ही त्यांची जीवनपद्धती आहे
9. पशुपालन करणाऱ्या समाजाची वैशिष्ट्ये लिहा.?
उत्तर – 1. हा समाज शंभर ते हजार लोकांचा असतो.
2.या जमातीमध्ये पाच हजार ते दीड लाख लोकांचा समावेश असतो.
3.हा समाज बहुदा कुरणे, डोंगर डोंगराळ प्रदेश वाळवंटे आणि शेतीला अयोग्य असलेल्या
प्रदेशात दिसतो.
4.पशुपालन हा प्रदेश सोयीचा आहे म्हणून पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे.
5.ज्याच्याकडे गुरे ढोरे आहेत तो श्रीमंत मानला जातो.
10. शेतकरी समाजाचे वैशिष्ट्ये सांगा.?
उत्तर – 👉मशागतीसाठी जनावरांचा उपयोग केल्याने अन्नाचे उत्पादन वाढले.
👉शेती करण्यासाठी ते स्थिर जीवन जगू लागले.
👉खेड्यांचा उदय झाला यातून शहराचा उदय झाला.
👉या समाजाचा मुख्य व्यवसाय मशागत करणे.
👉तीन हजार वर्षांपूर्वी नागराच्या शोधामुळे व्यवसायात क्रांती झाली
याचा परिणाम शहरातील लोकसंख्या वाढली.
11. कामगार समाजाचे वैशिष्ट्ये वर्णन करा.?
उत्तर - 👉नवीन संशोधनांचा समाज परिवर्तन झाले.
👉औद्योगिक लोक शहरात स्थलांतर करून लागले.
👉कारखाने उदयास आली.
👉कामगारांच्या कार्य कुशलतेवर श्रम आणि कार्यपद्धतीची विभागणी झाली.
👉या समाजामुळे कामगारांची गरज भासू लागल्यामुळे लोकांना का
मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा