/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

7th SS Textbook Solution Lesson 13 SAMAAJIK ANI DHARMIK SUDHARANA (पाठ 13 – सामाजिक आणि धार्मिक सुधारणा)

 

इयत्ता - सातवी

विषय - समाज विज्ञान 

माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - २०२२ सुधारित 

 स्वाध्याय 

पाठ 13 – सामाजिक आणि धार्मिक सुधारणा

 


  प्र. 1 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा..
1. भारताचे 'नवोदय पितामहअसे कोणाला म्हणतात ?
उत्तर - भारताचे 'नवोदय पितामहअसे राजाराम मोहन राय यांना म्हणतात.
2. 
महादेव गोविंद रानडे कोण होते ?
उत्तर - महादेव गोविंद रानडे हे समाज सुधारक होते.
3. 
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर - सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा जोतिबा फुले यांनी केली.
4. '
उठा! जागे व्हा ! ध्येय गाठेपर्यंत थांबू नकाअसे आवाहन कोणी केले?
उत्तर - 'उठा! जागे व्हा ! ध्येय गाठेपर्यंत थांबू नकाअसे आवाहन स्वामी विवेकानंद यांनी केले.
5. 
डॉ. अॅनी बेझंट कोण होत्या ?
उत्तर - डॉ. अॅनी बेझंट या एक ब्रिटिश समाजवादीशिक्षणतज्ज्ञ आणि महिला हक्कांसाठी कार्यकर्त्या होत्या.
6. 
अलीगढ चळवळीचे नेते कोण होते ?
उत्तर - अलीगढ चळवळीचे नेते सर सय्यद अहमद खान हे होते.
7. 
श्री.नारायण गुरू यानी कोणती संस्था स्थापन केली?
उत्तर -श्री.नारायण गुरू यानी श्री. नारायण धर्मपरीपालना योगम या संस्थेची स्थापना केली.

 
टीपा लिहा.
1. स्वामी विवेकानंद
उत्तर - स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला.त्यांचे मूळ नांव नरेंद्रनाथ दत्त असे होते.'उठा! जागे व्हा ! ध्येय गाठेपर्यंत थांबू नकाअसे आवाहन स्वामी विवेकानंदानी भारतीय युवकाना केले. स्वामी विवेकानंदानी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व स्विकारले व त्यानंतर ते सन्यासी बनले.
               रामकृष्ण परमहंसांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्याना संघटिन करून मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली.1893 साली अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत विवेकानंदानी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.तेथे त्यानी वेदांच्या तत्वज्ञानाबाबत दिलेल्या व्याख्यानाने त्यांना जगप्रसिद्ध बनविले.
स्वामी विवेकानंदानी भारतात पायी भ्रमण करताना भारतातील त्या काळातील सामाजिक स्थितीबद्दल जाणून घेतले. “जोपर्यंत लोक गरीबीभूक व अज्ञानात असतील तोपर्यंत मी पुन्हा जन्म घेऊन ती नाहिशी करण्यासाठी श्रम करीन" असे म्हणत होते.
स्वामी विवेकानंदाना बाळ गंगाधर टिळक यानी 'राष्ट्रीयतेचे खरे पितामहअसे म्हटले आहे. सुभाषचंद्र बोस सारखे अनेक नेते स्वामी विवेकानंदाच्या विचारांनी प्रेरित झाले.

 
2. स्वामी दयानंद सरस्वती
उत्तर - स्वामी दयानंद सरस्वती ( 1824-1883) यानी आर्य समाजाची स्थापना केली. त्याचे मूळ नांव मूलशंकर असे होते.केवळ जन्माच्या आधारे ब्राह्मणांना अधिकार देण्यास विरोध केला.प्राचीन वेदकालीन भारतात आदर्श समाज अस्तित्वात होता.स्त्रियांसहित सर्वाना वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार आहे असे त्यांनी म्हटले.त्यादृष्टीने वाटचाल करण्यासाठी त्यानी "वेदाकडे परत चला" असे आव्हान केले.मूर्तीपूजा,अस्पृश्यता,बालविवाह,जाती व्यवस्थेला विरोध केला.
      दयानंद सरस्वती यांनी आंतरजातीय व विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले.एवढेच नाही तर एक देवाराधनेचे प्रतिपादन केले.दयानंद सरस्वती यानी आपली तत्वे प्रसिद्ध साहित्यकृती 'सत्यार्थ प्रकाशग्रंथात मांडली आहेत.आर्य समाजाने भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी प्रयत्न केले.राष्ट्रीय चळवळीला स्फूर्ती दिली.लोकमान्य टिळक,लाला लजपतराय यांसारखे राष्ट्रीय नेते आर्य समाजाच्या तत्वानी प्रभावित झाले.धर्मांतर करून पुन्हा हिंदू धर्मात येणाऱ्यांसाठी दयानंदांचे शिष्य श्रद्धानंद यानी शुद्धी चळवळ सुरू केली.दयानंदानी गोपूजेचे प्रतिपादन केले.आर्य समाजाचे स्वराज्य आणि स्वदेशी विचारांचे प्रतिपादन करण्याचे आंदोलन होते.

 
3. 
सर सय्यद अहमद खान.
उत्तर - हिंदू मुस्लिमांच्यात सामंजस्य आणण्याचे प्रयत्न सर सय्यद अहमद खान यांनी केले.यांचा जन्म 1817 मध्ये दिल्लीमध्ये झाला.त्यांची ईस्ट इंडिया कंपनीचा न्यायाधिकारी म्हणून नेमणूक झाली.त्यांना आपला समुदाय इंग्लिश शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे आर्थिक व सामाजिक संधीपासून दूर आहेतअसे वाटे.शिक्षण घेऊन सरकारमध्ये आपल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्याची महत्वाकांक्षा होती.
       एक समाजसुधारक म्हणून पडदापद्धतबहुपत्नीत्व आणि घटस्फोट यांचा त्यांनी विरोध केला.इंग्लिश वैज्ञानिक आणि साहित्याचे उर्दू भाषांतर केले.यासाठी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली.नंतर या सोसायटीचे 'सायंटीफिक सोसायटीअसे नामकरण करण्यात आले. मुस्लिमांच्यात वैज्ञानिक विचारांचा प्रचार करण्यासाठी हे ‘अलीगढ इन्स्टीट्यूट गॅजेटनावाने पत्रक सुरू केले. हे पत्रक इंग्लिश व उर्दू भाषेत प्रकाशित होत होते.

 
4. श्री.नारायण गुरू-
उत्तर - श्री.नारायण गुरू हे संत व समाज सुधारक म्हणून प्रसिद्ध होते.यांचा जन्म 1854 साली तिरूवांकूरींच्या 'एळवसमुदायातील कुटूंबात झाला.1903 साली त्यांनी 'श्री नारायण धर्मपरिपालना योगम्संघटनेची स्थापना केली. याद्वारे त्यांनी केरळमधील एळवरू सहीतमागास समुदायातील सामाजिकआर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी प्रयत्न केले. जातीभेद,प्राणीहत्या यांचा विरोध केला.संस्कृत शाळांची सुरुवात करून त्यामध्ये जातीभेद न मानता सर्वांना प्रवेश दिला.त्यांनी सुमारे तीस देवालयांची निर्मिती केली.केरळमधील अस्पृश्यांसह सर्वांना प्रवेश मिळवून दिला. देवालयामध्ये सर्व जातीधर्माचे ग्रंथ असलेले ग्रंथालय असले पाहिजे असा आग्रह धरला,इच्छा व्यक्त केली.
     श्री नारायण गुरू यांच्या एक देवएक धर्मएक जातया विचारात त्यांचा आशय दडलेला आहे. (One God, One Religion and One caste) यांचा प्रभाव कर्नाटकात पडल्याचे दिसून येते. नारायण गुरुंचे 1928 साली निधन झाले.

 


इयत्ता - सातवी
विषय - मराठी
सत्र -2
📝प्रश्नोत्तरे📝
*🧿13. संतवाणी (अभंग) (श्लोक)

*🧿14. डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद

*🧿15. तीन प्रश्न (चित्रकथा)

*🧿16. क्षणात जिंकीन (कविता)

*🧿17. आमची गोव्याची सहल

*🧿18. वयाची अट नाही

*🧿19. अपंग आम्हा म्हणू नका (कविता)

*🧿20. जावयाची करामत

*🧿21. वाढती लोकसंख्या-एक समस्या

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा