URGENT FOR UPCOMING TEACHERS' TRANSFER PROCESS
EEDS सॉफ्टवेअरमधील माहिती अंतिम करणेबाबत
वरील प्रकरणाच्या संदर्भात,याद्वारे संबंधित माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि क्षेत्र शिक्षणाधिकारी आणि कार्यालय प्रमुखांना असे सूचित केले जाते की,कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्या आता सुरू होणार आहेत तरी शिक्षकांच्या सेवापुस्तकाप्रमाणे EEDS प्रणालीमध्ये शिक्षकांचे सेवा तपशील बरोबर असल्याचे तपासणे आणि आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे व सदर तपशील अंतिम करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर,पुढील मुद्यांसह शिक्षकांचे सेवा तपशील पुन्हा तपासण्यात येणार आहेत तरी शिक्षकांनी EEDS सॉफ्टवेअरमधील पुढील सेवा तपशील तपासून बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.
1. शिक्षकांचा नियमित KGID क्रमांक नोंदणी आहे का तपासणे.
2. कन्नड आणि इंग्रजीमध्ये अनुक्रमे शिक्षकाचे नाव बरोबर आहे का तपासणे.
3.शिक्षकाची जन्मतारीख,सेवेत रुजू झाल्याची तारीख, सध्याच्या पदावरती रुजू झाल्याची तारीख तपासणे.
4.शिक्षकांच्या सेवा माहिती कोणताही कॉलम रिकामा नसल्याची खात्री करणे.
5.अनुदानित शाळेतील शिक्षक म्हणून सरकारी शिक्षक म्हणून नाव नोंदणी झाली आहे का तपासणे व आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे.
6. प्राथमिक शाळेतील शिक्षकांची हायस्कूल शिक्षक म्हणून नोंदणी झालेली आहे का ते तपासले व आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे.
7. वर्किंग झोन (A,B,C झोन) तपासणे व बरोबर असल्याची खात्री करावी.
8. शिक्षकांच्या सवलत (EXEMPTION) प्राधान्य तपासणे व आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे.
9. कार्यरत शाळेतील मॅपिंग झाले आहे का ते तपासणे.
10.नियुक्ती आदेशानुसार शिक्षकांचा अध्यापन विषयाची नोंद असावी.कायमपुर्व कालावधी घोषणा (PP Declaration) माहिती नोंद असल्याची खात्री करावी आणि Spouse Details बद्दल नोंदणी असणे आवश्यक आहे.
11. सेवानिवृत्तांना सॉफ्टवेअरमधून EXIT करणे आवश्यक आहे.
12. निलंबित शिक्षकांचा तपशील त्यांच्या सेवेच्या तपशिलात नमूद करावा आणि इतर महत्वाचे सेवा तपशील तपासून योग्य दुरुस्ती करावी.
विभागातील संबंधित अधिकारी जसे की हायस्कूलचे मुख्याध्यापक, क्षेत्र शिक्षण अधिकारी आणि सर्व कार्यालयांचे प्रमुख यांना त्यांच्या अखत्यारीत काम करणार्या शिक्षक /अधिकार्यांचे सेवा रेकॉर्ड तपासण्याचे आणि योग्य माहिती प्रविष्ट केली गेली आहे याची पुष्टी करण्याचे निर्देश दिले आहेत. दिनांक- 03/06/2023 पूर्वी सदर परिशीलन पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
अचूक सेवा तपशील नमूद न करता भविष्यात आणखी विसंगती आढळल्यास, संबंधित अधिकारी जबाबदार असतील आणि त्यानंतर बदलीसाठी विचार केला जाणार नाही.
या संदर्भात जिल्हा उपनिर्देशकानी पडताळणी अहवाल दिनांक:-03/06/2023 पर्यंत या कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहे.

EEDS LOGIN LINK - CLICK HERE TO LOGIN
(Username - KGID NO.
Password - As per Shikshak Mitra app)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा