कर्नाटक सरकारची गृहलक्ष्मी योजना
Karnataka Govt's Gruha Laxmi Scheme for women
राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढविण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत.कुटुंबाच्या व्यवस्थापनात महिला कुटूंब प्रमुखाची भूमिका महत्त्वाची असते आणि महिला कुटूंब प्रमुख आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर कुटुंब व्यवस्थापन अधिक चांगले होईल.त्यामुळे कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा रु.2000/- देण्यासाठी "गृहलक्ष्मी योजना" लागू करण्यात आली आहे.
👉राज्यातील महिला कुटुंब प्रमुखाला प्रति महिना 2000/- देणारी गृह लक्ष्मी योजना 2023-24 मध्ये खालीलप्रमाणे अंमलात आणण्यासाठी ಮಮ ಇ 70 ಮಮ ಅ 2023, ಬೆಂಗಳೂರು, ದಿನಾಂಕ: 6ನೇ ಜೂನ್ 2023 या आदेशानुसार प्रशासकीय अनुमोदन देण्यात आले आहे.
कर्नाटक सरकारच्या खात्री योजनेमधील शक्ती योजना,गृह ज्योती,अन्नभाग्य
या योजना यशस्वीपणे अंमलात आणल्यानंतर आता बहुचर्चित चौथी योजना गृहलक्ष्मी योजना
जुलै 19 पासून विधानसभेमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामया यांच्या हस्ते सुरू करण्यात
येणार आहे.
महिला आणि बालकल्याण खात्याकडून जून 15 पासून वारंवार पुढे ढकलण्यात येत असलेल्या या योजनेचा अंतिम मुहूर्त ठरलेला आहे.जुलै 19 पासून कुटुंब महिला प्रमुखांना महिना 2000/- अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु करण्यात येणार आहे.
योजनेचा शुभारंभ – 19 जुलै 2023 रोजी
नोंदणी – 20 जुलै 2023 पासून
नोंदणी अंतिम दिनांक- निर्धारीत
केलेली नाही
अर्ज करण्यासाठी आवश्यक दाखले –
या योजनेसाठी अर्ज करण्यास खालील दाखले आवश्यक आहेत.
q रेशन कार्ड
q पती-पत्नी दोघांचे आधार कार्ड
q आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर
q
आधार लिंक नसल्यास इतर बँकेत खाते असल्यास त्या बँक खात्याचे पासबुक
खालील निकष पूर्ण करणाऱ्या महिला प्रमुख या योजनेसाठी पात्र असतील-
👉अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत वितरीत करण्यात आलेल्या अंत्योदय, BPL आणि APL शिधापत्रिकेत कुटुंब प्रमुख म्हणून उल्लेख केलेली महिला या योजनेची पात्र लाभार्थी आहे.👉एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला असल्यास ही योजना फक्त एका महिलेसाठी लागू आहे.
ज्यांना खालील निकष आहेत ते या योजनेसाठी पात्र नाहीत.
👉जर कुटुंबाची महिला प्रमुख किंवा महिला प्रमुखाचा पती आयकरदाता असेल (Income टॅक्स भरत असल्यास.) तर या योजनेसाठी पात्र नाहीत.
👉जर कुटुंबाची महिला प्रमुख किंवा महिला प्रमुखाचा पती GST रिटर्न भरणारा असेल तर या योजनेसाठी पात्र नाहीत.
👉या योजनेच्या लाभार्थ्यांनी 20 जुलैपासून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.त्यानंतर अर्जांची पडताळणी करून लाभार्थ्यांची निवड केली जाईल.15 ऑगस्ट रोजी निवडक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2000/- रक्कम जमा केली जाईल.
👉अर्जदाराने सादर केलेल्या संपूर्ण अर्जामध्ये स्वयं-घोषणा आधारावर मंजूरी दिली जाईल.त्यानंतर अर्जाची छाननी केली जाईल.खोटी माहिती देऊन सुविधेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास,अर्जदाराकडून आधीच भरलेली रक्कम वसूल केली जाईल आणि अशा व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
👉या योजनेच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असले पाहिजे.
नोंदणी प्रक्रिया कशी असेल?
1. रेशन कार्डमधील कुटुंब प्रमुखाच्या मोबाईल नंबर वरती
गृहलक्ष्मी योजनेची नोंदणी करण्यासाठी दिनांक,वेळ आणि स्थळ यांचा मेसेज येईल.
2.मेसेज मध्ये दिलेल्या वेळी सरकारमान्य ग्राम वन,बापूजी सेवा केंद्र,कर्नाटक वन ऑनलाईन सेंटर
मध्ये जाऊन नोंदणी करावी.
3. नोंदणी संबंधी मेसेज आला नसेल तर 1902 यावरती कॉल करावा
किंवा 8147500500 या व्हाट्सअप नंबर वरती मेसेज करून नोंदणी संबंधी माहिती
मिळवावी.
4.दिलेल्या निर्धारित वेळेत जाऊन नोंदणी करणे शक्य न
झाल्यास.त्या सेवा केंद्रावर सायंकाळी 5 ते 7 दरम्यान जाऊन नोंदणी करता येईल किंवा
गृहलक्ष्मी योजनेसाठी एक जन प्रतिनिधी आपल्या घरी येऊन नोंदणी करतील.
गृहलक्ष्मी योजनेची नोंदणी स्वतः करता येणार नाही त्यासाठी
सरकारमान्य ऑनलाईन केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करावी लागेल.
अधिक माहितीसाठी सरकारी वेबसाईट वर भेट द्या..👇👇👇
नजीकच्या ग्राम वन सेंटर्स, बेंगलोर वन,कर्नाटक वन, ग्रामपंचायत,नाडकचेरी इत्यादी ठिकाणी भेट द्या..
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
गृह ज्योती योजना
💡200 युनिट मोफत वीज हमी योजना 💡गृह ज्योती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक 💡संपूर्ण माहिती 💡अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे 💡कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृह ज्योती योजनेंतर्गत प्रत्येक घरगुती ग्राहकासाठी मासिक 200 युनिटपर्यंत मोफत वीज सुविधा मिळविण्यासाठी खालील लिंक वापरून नोंदणी करा आणि अर्ज करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.smartguruji.in/2023/06/gruha-jyothi-scheme-application.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा