/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

SSLC/PUC exam in Karnataka will be held 3 times कर्नाटकातील SSLC/PUC वार्षिक परीक्षा होणार 3 वेळा

SSLC/PUC exam in Karnataka will be held 3 times कर्नाटकातील SSLC/PUC वार्षिक परीक्षा होणार 3 वेळा 
 
   सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक वार्षिक परीक्षा आणि एक पुरवणी परीक्षा घेतली जाते.परीक्षेच्या या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर अधिक ताण आणि परीक्षेची चिंता निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ज्ञानधारणा,अर्थपूर्ण अध्ययन आणि शैक्षणिक प्रगतीला खीळ बसत आहे.

            सध्याच्या PUC II परीक्षेत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी प्राप्त गुणांवर समाधानी नसल्यास, वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण नाकारण्याचा पर्याय आहे.पण मागील परीक्षेत मिळालेले गुण विचारात न घेता पुरवणी परीक्षेतील मिळालेले गुण अंतिम गुण मानले जातात.ही पद्धत विद्यार्थीस्नेही नाही,कारण विद्यार्थ्याला दोन्ही परीक्षांमध्ये आपले सर्वोत्तम गुण टिकवून ठेवण्याचा पर्याय नाही.जर आपण सुधारित पद्धतीचा अवलंब केला तर ती 1, 2 आणि 3 परीक्षांमध्ये मिळालेले सर्वोत्तम गुण टिकवून ठेवण्याची संधी देईल आणि पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीमध्ये निवड प्रक्रियेत चांगली संधी मिळू शकेल.
 
           प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययनाचा वेग आणि पद्धती वेगवेगळी असते.जर 1,2,3 परीक्षा घेतल्या तर त्यांच्या अध्ययनाच्या वेगाशी जुळवून घेण्यास मदत होईल आणि विद्यार्थी शिकत असताना वेळेच्या मर्यादांचा दबाव कमी होईल.
          “पुरवणी परीक्षा” या नावाऐवजी “वार्षिक परीक्षा 1 2आणि 3” अशा नावांनी तीन संधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांची एकूण कार्यक्षमता आणि सकारात्मक वृत्तीला प्रोत्साहन मिळेल.या तीन वार्षिक परीक्षाबाबत परीक्षा मंडळामार्फत पुढील बाबी लक्षात घेतल्या जातील.

1. या सुधारणा पद्धतीबाबत बोर्डाकडून विद्यार्थ्यांना परिपत्रकाद्वारे स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.

2 या तीन परीक्षांमध्ये विषय आणि काठिण्य पातळीत एकसमानता राखली जाईल.

3. या तीन प्रयत्नांमध्ये मिळालेल्या गुणांपैकी विषयानुसार सर्वोत्तम गुण निवडण्याची परवानगी दिली जाईल.

4 पुढील शैक्षणिक वर्षात प्रथम PUC किंवा पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सेतुबंध कार्यक्रम आयोजित केला जाईल.
 
परीक्षा मंडळाचे संभवनीय परीक्षा वेळापत्रक -: 

इयत्ता - 12वी (PUC II) 
परीक्षा - 1   1 मार्च ते 25 मार्च   निकाल -22 एप्रिल  पुनर्मुल्यांकन निकाल - 10 मे 

परीक्षा - 2  25 मे ते 5 जून      निकाल - 21 जून     पुनर्मुल्यांकन निकाल - 29 जून  

परीक्षा- 3  12 जुलै ते 30 जुलै  निकाल - 16 ऑगस्ट     पुनर्मुल्यांकन निकाल- 25 ऑगस्ट

इयत्ता - 10वी (SSLC) 
परीक्षा - 1   30 मार्च ते 15 एप्रिल   निकाल -8 मे  पुनर्मुल्यांकन निकाल - 23 मे 

परीक्षा - 2  12 जून ते 19 जून      निकाल - 29 जून     पुनर्मुल्यांकन निकाल- 10 जुलै  

परीक्षा- 3  29 जुलै ते 05 ऑगस्ट  निकाल - 19 ऑगस्ट  पुनर्मुल्यांकन निकाल- 26 ऑगस्ट
 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा