इयत्ता - सहावी
विषय - समाज विज्ञान
माध्यम - मराठी
अभ्यासक्रम - 2022 सुधारित
18.मुलभूत हक्क आणि कर्तव्ये
गटात चर्चा करून उत्तरे द्या.
1. मूलभूत हक्क म्हणजे
काय ?
उत्तर - संविधानाने सांगितलेल्या
तसेच कायद्याने ज्या हक्काचे रक्षण केले आहे. अशा हक्कांना 'मूलभूत हक्क' असे म्हणतात.
2. मूलभूत कर्तव्याचे पालन आपण स्वयंस्फूर्तीने का
केले पाहिजे ?
उत्तर - देशाच्या प्रगतीत हातभार
लावण्यासाठी देशाची सर्वांगीण वाढ आणि विकासासाठी आपण स्वयंस्फूर्तीने मूलभूत
कर्तव्याचे पालन केले पाहिजे.
3. समानतेचा हक्क म्हणजे काय ?
उत्तर - धर्म,वंश,जात,लिंग,जन्मस्थळ या
कारणावरून कोणताही पक्षपात न करता.सर्वांना संरक्षण मिळणे,कायद्यासमोर सर्वजण समान असणे याला समानतेचा हक्क असे
म्हणतात.
4. सामाजिक आणि आर्थिक शोषण कसे होते ? उदा. द्या.
उत्तर - जेव्हा समाजात महिला,मुले आणि दुर्बलांचा गैरफायदा घेतला जातो तेव्हा सामाजिक
आणि आर्थिक शोषण होते.उदा. हुंडा,बालमजुरी
इत्यादी.
5. कोणतीही तीन मूलभूत कर्तव्ये लिहा.
उत्तर - - संविधान, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
- भारताच्या एकात्मतेचे रक्षण करणे.
- मातृभूमीचे संरक्षण करणे.
चर्चा करा.
1. मूलभूत हक्काचे महत्व.
मूलभूत हक्कामुळे व्यक्तीच्या
स्वातंत्र्याचे रक्षण आणि सामाजिक प्रगतीला चालना देण्यासाठी मूलभूत हक्कांचे
कार्य आहे.
2. शालेय परिसरात विद्यार्थ्यांनी पाळावयाची
कर्तव्ये.
उत्तर - शाळेतील नियमांचे पालन
करणे.
शिक्षकांचा आदर करणे.
शाळेतील विविध स्पर्धेत भाग घेणे.
3. माहिती हक्क.
उत्तर - नागरिकांना आवश्यक
माहिती सहज मिळण्यासाठी आणि कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी माहिती हक्क
महत्त्वाचा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा