/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

11. गोड गाणी

इयत्ता - सातवी 

विषय - मराठी

11. गोड गाणी

या लाडक्या मुलांनो या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार

नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार ।।ध्रु।।

आईस देव माना वंदा गुरुजनांना

जगी भावनेहूनी त्या कर्तव्य थोर जाणा

गंगेपरी पवित्र ठेवा मनी हा विचार ।। 1 ।।

शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे

टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पुजावें

जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार 112 ।।

शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा

हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा

कुलशील मान राखा ठेवू नका विचार ।।3।।

 

स्वार आणि सावळ्या

सावळ्या : खबरदार जर टाच मारुनी जालपुढं चिंधडया

उडविन राइ राइ एवढया ॥ धृ ॥

कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे

शीव ही ओलांडुनि तीरसे?

लगाम खेंचा हा घोडीचा राव टांग टाकुनी

असे या तुम्ही खडया अंगणी !

पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेंऊ ही

मला का ओळखलें हो तुम्ही ?

हा मर्द मराठयाचा मी बच्चा असे,

हे हाडहि माझे लेचेंपेचें नसे

या नसानसांतुन हिंमतबाजी वसे

खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे,

'चिंधडया-उडविन राइ राइ एवढया! ||1||

स्वार : मळयात जाउन मोटेचे ते पाणी धरावे तुवां

कशाला ताठा तुज हा हवा ?

मुठींत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरें

वीर तू समजलास काय रे?

थोर मारसी अशा बढ़ाया पराक्रमाच्या जरी

अणकुचीदार अति भाल्याचे टोक ते l

 

यापुढे तुझी वद हिंमत का राहते ?

खबरदार जर पाऊल पुढे टाकशील चिंधडया

उडविन राई राई एवढया 112 11

 

सावळ्या : आपण मोठे दाढीवाले अहां वीर बायकी

किती ते आम्हाला ठाउकी।

तडफ आमुच्या शिवबाजीची तुम्हां माहिती न का ?

दावितां फुशारकी का फुका ?

तुम्हासारखे असतील किती लोळविले नरमणी

आमुच्या शिवबानें भर रणी

मी असें इमानी चेला त्यांचेकडे

देईन न जाऊं शूर वीर फाकडे

हुकमाविण त्यांच्या समजा याचे पुढें

पुन्हा सांगतो खबरदार जर जालपुढें,

चिंधडया उडविन राइ राइ एवढया! || 3 ||

लाल भडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे

(स्वार परि मनी हळू का हसे ? )

त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळें

स्वार परि सौम्य दृष्टिने खुले

चंद्र दिसे एक जणूं दुसरा तपतो रवि का तर

ऐका शिवबाचे हे स्वर

"आहेस इमानी माझा चेला खरा

चल इनाम घे हा माझा शेला तुला

पण बोल सावळ्या पुन्हां बोल एकदा

 "खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे,

चिंधडया उडविन राइ राइ एवढया! ॥ 4

 

नव्या जगाची आण

(समुह नृत्यगीत)

तुझ्या कामामधुन, तुझ्या घामामधुन, उद्या पिकलं सोन्याचं रान

चल उचल हत्त्यार, गड्या होउन हुशार

तुला नव्या जगाची आण || धु।।

तुझ्या घणाच्या घावामधुन, उठे उद्यांच्या जगाची आस

तुझ्या घामाच्या थेंबामधुन, पिके भुकेल्या भावाचा

तुझ्या ध्यासामधुन, तुझ्या श्वासामधुन घास

जुळे नव्या जगाचें गान ।।1।।

तुझ्या पोलादी टांचेखालुन, जित्या पाण्याचे निघतिल झरे

तुझ्या लोखंडी दंडामधुन, वाहे विजेची ताकद कि रे

चल मारु धडक, उभा फोडू खडक, | आता कशाची भूक तहान ॥ 2

 

भाग्य लिहिलेलं माझं तुझं, घाम आलेल्या भाळावरी

स्वप्न लपलेलं माझं तुझं, इथं बरड माळावरी

घेऊन कुदळखोरं, चल जाऊं म्होरं, देऊं देशाला जीवदान ।। 3 ।।

 

सौजन्य - इयत्ता सातवी माय मराठी

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा