/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

प्रजासत्ताक दिन भाषण 5 REPUBLIC DAY SPEECH 5

   


 

प्रजासत्ताक दिन 

 भाषण 5


चला तिरंगा फडकावूया,
चला तिरंगा फडकावूया,
हा आपला प्रजासत्ताक दिन आहे,
या अभिमानाने साजरा करूया
    आजच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष,व्यासपीठावरील मान्यवर,पूज्य गुरुजन, प्रतिष्ठित नागरिक व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो आज आपण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. प्रथमता आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
26 जानेवारी 1950 या दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आली आणि आपला भारत देश प्रजासत्ताक देश बनला.म्हणून 26 जानेवारी हा दिवस भारतीय इतिहासातील अविस्मरणीय दिवस आहे.या दिवसाचे महत्त्व अबाधित रहावे यासाठी भारतभर हा दिवस संपूर्ण आनंदाने व अभिमानाने साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची पहाट उगवली हे आपण सर्वांना माहीत आहे पण त्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार व्यवस्थित चालावा यासाठी राज्यघटनेची गरज होती.यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करून अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून सर्वसमावेशक अशी भारतीय राज्यघटना तयार केली व ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 या दिवशी ही अधिकृतपणे अमलात आली.शेवटी मला इतकेच सांगावेसे वाटते की,आपला देश सर्वात मोठा लोकशाही देश असला तरी देशापुढे गरिबी,बेरोजगारी,प्रदूषण अशा अनेक समस्या आहेत.पण आपण सर्वांनी एकात्मतेने राहून या समस्यांचा सामना करून देशाच्या विकासात योगदान देऊया.
तुझ्या कामामधून,तुझ्या घामामधून
उद्या पिकल सोन्याचं रान
चल उचल हत्यार
गड्या होऊन हुशार
तुला नव्या जगाची आन
तुला नव्या जगाची आन

जय - हिंद

जय - भारत



प्रजासत्ताक दिनानिमित्त आदर्श मराठी,हिंदी,इंग्रजी भाषणे 👇👇👇👇👇👇👇👇 https://bit.ly/3GYxHLS


प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन 👇👇👇👇👇👇👇👇 https://bit.ly/3AkfcyK


Subscribe Our Channel for latest updates

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

http://youtube.com/@smartguruji2022

Your subscription will inspire us..

Join our WhatsApp Group for latest updates

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.smartguruji.in/2022/04/smartgurujiin-whatsappfacebook-groups.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा