POST / May 5, 2025

कर्नाटक जाती गणती 2025 विषयी...

कर्नाटक राज्य अनुसूचित जाती गणती 2025 चे कार्य पार पाडताना कांहीं महत्वाचे मुद्दे ..📌जाती सर्वेक्षण करायला जाणाऱ्यांसाठी काही टिप्स. पूर्ण वाचा, नक्कीच मदत होईल.📌मतदान यादीतील क्रम क्रमांकाप्रमाणे सर्वेक्षण करू नका, एक गल्ली, एक एरिया किंवा एक रस्ता बाजूने सर्वेक्षण करा, खूप सोपे

कर्नाटक राज्य अनुसूचित जाती गणती 2025 चे कार्य पार पाडताना कांहीं महत्वाचे मुद्दे ..

📌जाती सर्वेक्षण करायला जाणाऱ्यांसाठी काही टिप्स. पूर्ण वाचा, नक्कीच मदत होईल.

📌मतदान यादीतील क्रम क्रमांकाप्रमाणे सर्वेक्षण करू नका, एक गल्ली, एक एरिया किंवा एक रस्ता बाजूने सर्वेक्षण करा, खूप सोपे होईल.

📌एका घराचे सर्वेक्षण झाल्यावर मतदार यादीत पाहून त्या कुटुंबाला 'बरोबर' अशी खूण करा.

📌सर्वेक्षण पूर्ण झालेल्या घराच्या दारावर किंवा भिंतीवर सर्वेक्षण झाल्याचे लिहून या. उदा. 'जा. स. 2025' (जाती सर्वेक्षण 2025) किंवा 'CC2025' (CASTE CENSUS) असे नोंदवा. यामुळे तुम्हाला गोंधळ होणार नाही. 

📌सर्वेक्षण पूर्ण झालेल्या किंवा राहिलेल्या घरांची माहिती मिळेल.

📌सर्वेक्षण विभागाकडून दिलेले ओळखपत्र घालून जा.जर सर्वेक्षण विभागाने ओळखपत्र दिले नसेल, तर तुमच्याजवळ असलेले शिक्षण विभागाचे ओळखपत्र गळ्यात घालून जा.

📌रेशन कार्ड प्रथम घेऊन नंतर सर्वेक्षण करा.  रेशन कार्ड मिळाल्यास अर्धे काम झाल्यासारखे समजा, काम सोपे होईल.

📌प्रत्येक रेशन कार्डला वेगळे कुटुंब मानावे.

 📌रेशन कार्डच्या आधारावर सर्वेक्षण करा, मतदार यादीच्या आधारावर सर्वेक्षण करू नका. मतदार यादी तुम्हाला कुटुंब किंवा घर ओळखण्यासाठी उपयुक्त आहे.

📌माहिती देणारे जी माहिती देतात, ती अंतिम मानावी, प्रतिप्रश्न विचारू नये.

📌सर्वेक्षण वस्तुस्थितीवर आधारित असावे, अंदाजाला संधी नसावी.

📌शक्यतो नम्रपणे प्रश्न विचारा आणि उत्तरे मिळवा, काहीवेळा काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मन वळवावे लागते.

📌नम्रपणे वागा आणि संयमाने प्रश्न विचारा.

📌माहिती देणारे व्यक्ती जी जात सांगतात, ती अंतिम असते.

📌कोणत्याही परिस्थितीत, 'डमी ॲप' मध्ये माहिती टाकू नका किंवा सर्वेक्षण करू नका. अधिकृत ॲप किंवा अंतिम ॲप जारी केलेल्या ॲपमध्येच सर्वेक्षण करा.

📌रेशन कार्ड, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र या 3 पैकी एक अनिवार्य असल्यास, त्याच घराचे सर्वेक्षण करा.

📌विवाह होऊन दुसऱ्या गावाला गेलेल्या किंवा नवऱ्याच्या घरी असलेल्या महिला सदस्याचे नाव त्या घराच्या सर्वेक्षण यादीतून काढून टाका.

📌मोबाईल चार्ज करण्यासाठी शक्य असल्यास चार्जर आणि पॉवर बँक घेऊन जा.

📌सर्वेक्षणात प्रत्येक कुटुंबाला 42 प्रश्न विचारून उत्तरे मिळवा.

📌तुम्हाला सर्वेक्षणासंदर्भात काही समस्या असल्यास, सर्वेक्षण हेल्पलाईन, पर्यवेक्षक, मास्टर ट्रेनर, तालुका समन्वय अधिकारी यांना फोन करून समस्येचे निराकरण करून घ्या.

📌अधिक माहितीसाठी सर्वेक्षण पुस्तिका पृष्ठ क्रमांक 83 ते 90 पर्यंतचे मराठीमध्ये स्पष्टीकरण दिले आहे.👉येथे वाचा.

Community conversation 0

Leave a comment

THE LEARNING LETTER

Good things in your inbox.

New resources, classroom inspiration, and updates. No noise.